कोहमारा शाळेत कोरोना लसीकरण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:27 IST2021-04-06T04:27:52+5:302021-04-06T04:27:52+5:30
दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना महामारीवर आळा घालण्यासाठी शासन स्तरावरून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. प्रशासनाच्या वतीने ...

कोहमारा शाळेत कोरोना लसीकरण ()
दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना महामारीवर आळा घालण्यासाठी शासन स्तरावरून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून जनतेने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून आरोग्य पथकाच्या वतीने मिशन कोविड लसीकरण राबविण्यात येत आहे. कोहमारा येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरण प्रसंगी सरपंच वंदना थोटे उपस्थित होत्या. यावेळी पोलीस पाटील अनिल दीक्षित, ग्रामपंचायत सदस्य दिनेश मसराम उपस्थित होते. यावेळी गावातील ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनी लस घेऊन चांगला प्रतिसाद दिला. या लसीकरणासाठी डॉक्टर कुमुदिनी हटवार, वि. सी. कुडमते, एस जी मानकर, पी.व्ही. भगत, एल डी लांजेवार, यु. एस. कोटांगले, इंदिरा राऊत, शालिनी राऊत, रेखा टेंभुर्णे, माया गजभिये, अंगणवाडी सेविकांनी सहकार्य केले.