कोरोना चाचणी व लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST2021-04-07T04:30:19+5:302021-04-07T04:30:19+5:30
सकारात्मक विचार अंगीकारून प्रत्येकानी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा,नियमांचा अंगीकार करावा. मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता स्वयंस्फूर्तीने कोरोना चाचणी ...

कोरोना चाचणी व लसीकरण मोहीम
सकारात्मक विचार अंगीकारून प्रत्येकानी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा,नियमांचा अंगीकार करावा. मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता स्वयंस्फूर्तीने कोरोना चाचणी करण्यासाठी पुढे यावे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्वेता कुळकर्णी यांनी केले. कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असून, प्राथमिक आरोग्य केंद्र चान्नाच्या वतीने मिशन कोविड लसीकरण आरोग्य उपकेंद्रात सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारला (दि.५) भिवखिडकी येथे ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात आली, तसेच गावातील ४० नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. बोंडगावदेवी आरोग्य उपकेंद्रात ४०, त्याचप्रमाणे चान्ना प्राथमिक आरोग्य केंद्रात २० जणांना कोरोना लस देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी श्वेता कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.नाकाडे, डॉ.कुंदन कुलसुंगे, आरोग्यसेविका राऊत, भूमाली उईके, आरोग्यसेवक साखरे, मेश्राम, राऊत, दोनोडे यांचेसह आरोग्य कर्मचारी कोरोना लसीकरणासाठी परिश्रम घेत आहेत.