पीपीई कीटअभावी कोरोना चाचणीला ब्रेक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST2021-04-23T04:31:07+5:302021-04-23T04:31:07+5:30
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील सातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील दोन दिवसांपासून पीपीई कीट नसल्याने कोरोना चाचण्या बंद आहे. ...

पीपीई कीटअभावी कोरोना चाचणीला ब्रेक ()
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील सातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील दोन दिवसांपासून पीपीई कीट नसल्याने कोरोना चाचण्या बंद आहे. परिणामी तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना आल्यापावलीच परत जावे लागत असल्याचे रुग्णांची गैरसोय होत आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. सातगाव आरोग्य केंद्रात मागील दोन दिवसांपासून कोरोनाची तपासणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना पीपीई कीट उपलब्ध नसल्याने आल्यापाऊली माघारी पाठविले जात आहे. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात २० एप्रिलच्या सायंकाळपासून पीपीई कीट उपलब्ध नसल्याने कोरोना तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कीटसंदर्भात विचारणा केली असता, पुरवठा होईल तेव्हा पाहू, असे उत्तर केंद्रातील कर्मचारी देत आहेत. सालेकसा तालुक्यातील सातगाव आरोग्य केंद्र हे महत्त्वाच्या केंद्रस्थानी असल्याने या ठिकाणी परिसरातील रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र रुग्णालयाच्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, येेथे दाखल रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या रुग्ण निवाऱ्याच्या बाजूला तसेच परिसरात केरकचरा पडलेला आहे. याबाबत गावातील काही नागरिकांनी तक्रारसुध्दा केली; पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. आरोग्य केंद्राच्या समोरील भागात तसेच मागच्या भागात केरकचरा साचलेला आहे. याकडे संबंधित अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष पुरविणे आवश्यक आहे.