कोरोना रूग्ण वाढीला लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:00:39+5:30

विदेशातून येणाऱ्यांमुळे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात २५ जून रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने कोरोना बाधितांचा आकडा २१० वर पोहचला. आतापर्यंत ३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने आतापर्यंत १५९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे.

Corona patient breaks growth | कोरोना रूग्ण वाढीला लागला ब्रेक

कोरोना रूग्ण वाढीला लागला ब्रेक

Next
ठळक मुद्दे१० कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त : ५२२२ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील १२ दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा व्दिशतक पार झाला आहे. रूग्ण संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होतो काय अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र रविवारी (दि.१२) प्रथम नवीन कोरोना बाधित रूग्णाची नोंद झाली नाही. तर १० कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना गेल्या १२ दिवसांत प्रथमच दिलासा मिळाला आहे.
विदेशातून येणाऱ्यांमुळे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात २५ जून रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने कोरोना बाधितांचा आकडा २१० वर पोहचला. आतापर्यंत ३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने आतापर्यंत १५९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. त्यामुळे सध्या केवळ ४७ कोरोना बाधितांवर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ५६६३ स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी २१० स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर ५२२२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. १६६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेडून प्राप्त व्हायचा असून ६३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहेत. रविवारी कोरोनामुक्त झालेल्यांना येथील कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. यावेळी येथील सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनामुक्त झालेल्यांना गुलाब पुष्प देऊन तसेच टाळ्या वाजवून निरोप दिला.

१४१८ जण क्वारंटाईन
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाºया व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात ठेवले जाते. सध्या ४०४ जण संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात तर १०१४ जणांना होम क्वारंटाईन ठेवण्यात आले असून या सर्वांवर आरोग्य विभागाची नजर आहे.

जिल्ह्यात आता १९ कंटेन्मेंट झोन
कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने त्याला प्रतिबंध लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत केला जात आहे. जिल्ह्यात सध्या एकूण १९ कंटेन्मेंट झोन आहेत. यात, गोंदिया तालुक्यातील ग्राम मुंडीपार, फतेहपूर, डोंगरगाव, सेजगाव, पारडीबांध, शहरातील कुंभारेनगर परिसर, सालेकसा तालुक्यातील ग्राम पाऊलदौना, पाथरी, शारदानगर, तिरोडा तालुक्यातील तिरोडा शहरातील सुभाष वॉर्ड, बेरडीपार, बेलाटी खुर्द, वीर सावरकर वॉर्ड, भुतनाथ वॉर्ड आणि गराडा, गोरेगाव तालुक्यातील ग्राम भडंगा, सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम राका, सौंदड व खोडशिवणीचा समावेश आहे.

Web Title: Corona patient breaks growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.