शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्याचे अर्धशतक पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

मागील आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र बुधवारी (दि.३) जिल्ह्यात एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. तर दोन कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण ५० कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात आता १९ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.

ठळक मुद्देजिल्हावासीयांना दिलासा : जिल्ह्यात केवळ १९ अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली होती. मात्र कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले असल्याने ही जिल्हावासीयांसाठी थोडी दिलासादायक बाब आहे. मंगळवारपर्यंत एकूण ४८ कारोना बाधीत कोरोनामुक्त झाले होते तर बुधवारी (दि.३) पुन्हा दोन कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त होणाºयाचे अर्धशतक पूर्ण झाले असून निश्चित जिल्हावासीयांसाठी ही आनंदाची बातमी आहे.मागील आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र बुधवारी (दि.३) जिल्ह्यात एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. तर दोन कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण ५० कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात आता १९ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.गेल्या दहा दिवसापासून सातत्याने रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ६९ वर पोहचला आहे. त्यातच आत्तापर्यंत आढळलेले सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचे हाटस्पॉट होत असल्याने जिल्हावासीय व प्रशासनाची चिंता वाढली होती.विशेष म्हणजे हे सर्व कोरोना बाधीत मुंबई, पुणे येथून आलेलेच आहे. तर काही नागरिक बाहेर जिल्हा आणि राज्यातून आल्यानंतर याची माहिती प्रशासनाला देत नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाला सुध्दा यावर बारीक नजर ठेवावी लागणार आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने ही थोडी दिलासादायक बाब आहे. कोरोना बाधीत रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याने आत्तापर्यंत ५० कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.सात दिवसात कोरोनामुक्त झाले ५० जणजिल्ह्यात पहिला कोरोना बाधित १० एप्रिल रोजी एक कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने त्याला सुटी देण्यात आली. त्यानंतर २८ मे रोजी २, २९ मे रोजी २५, ३० मे ४, ३१ मे ६, १ जून रोजी ६,२ जून रोजी ४, आणि ३ जून रोजी २ असे एकूण ५० कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली.कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर कर्मचाऱ्यांचे परिश्रम फळालादहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ६९ वर पोहचल्याने जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला होता. हे कर्मचारी दिवसरात्र कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करीत आहे. त्यांचे परिश्रम देखील फळाला आले असून त्यामुळेच आतापर्यंत ५० कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या