गोंदियावगळता सर्वच तालुक्यांत कोरोनाला उतरती कळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:27 IST2021-02-12T04:27:35+5:302021-02-12T04:27:35+5:30
गुरुवारी जिल्ह्यात ६ बाधितांची नोंद झाली, तर ८ बाधितांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी आढळलेले सर्व सहा रुग्ण गोंदिया तालुक्यातील ...

गोंदियावगळता सर्वच तालुक्यांत कोरोनाला उतरती कळा
गुरुवारी जिल्ह्यात ६ बाधितांची नोंद झाली, तर ८ बाधितांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी आढळलेले सर्व सहा रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने ६७११७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले त्यापैकी ५५४६४ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत ६६७१३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६०५७५ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४२७३ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १४०१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ७५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
........
७०४९ जणांना कोरोना लसीकरण
फ्रंट लाइन कोरोना योद्ध्यांना कोरोना लसीकरण केले जात आहे. आता दुसऱ्या टप्प्यात महसूल आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना सुद्धा लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ११ लसीकरण केंद्रांवरून ७०४९ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. तसेच कोरोना लसीकरणासाठी आता आठवड्यातील सहा दिवस निश्चित करण्यात आले आहेत.