कोरोनाने बदलविले जीवनाचे समीकरण; जुन्या पध्दतीचे होऊ लागले आचरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST2021-04-07T04:30:17+5:302021-04-07T04:30:17+5:30
जागतिक आरोग्यदिन विशेष गोंदिया : कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी व आताची आहार पध्दती यात तुलना केल्यास दोन्ही आहारांमध्ये खूप मोठी ...

कोरोनाने बदलविले जीवनाचे समीकरण; जुन्या पध्दतीचे होऊ लागले आचरण
जागतिक आरोग्यदिन विशेष
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी व आताची आहार पध्दती यात तुलना केल्यास दोन्ही आहारांमध्ये खूप मोठी तफावत दिसून येते. आधी तेलयुक्त पदार्थाचे सेवन करून कोलेस्ट्रार वाढविला जात होता. परंतु हा आहार कमी करून साधे जेवण, भात,भाजी, पोळी, वरण याकडेच लोकांचा कल वाढला आहे. तेलयुक्त पदार्थ जेवणात कमी झाले असून फळांचा वापर वाढला आहे. कोरोनाच्या संकटात खानपानावर विशेष लक्ष देण्यात येऊ लागले आहे. जूनं ते सोनं या म्हणीप्रमाणे भारतीय परंपरेतील खानपान, योग यावर भर दिला जाऊ लागला. शरीरारातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकडे सर्वांचा कल आहे,संतुलीत आहार व संपूर्ण झोप यावर भर दिला जात आहे.
............
मानसिक आरोग्य जपण्यासाठी घरात संवाद कराकोरोनाने अख्या जगाला विळख्यात घेतल्याने आजघडीला बहुतांश लोकांची मनस्थिती खालावलेली आहे. कोरोनाच्या संकटातून ग्रस्त झालेले लोक नैराश्य अंगी बाळगतात. पण असे होऊ नये कोरोनामुळे खूप काही बदलले असले तरी आपले व आपल्या कुटुंबाचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी घरात संवाद होणे आवश्यक आहे. मानसिकता चांगली राहावी व आरोग्य जपण्यासाठी नियमीत व्यायाम करावे, संतुलीत आहार घ्यावा, रूटीन फालो करावा, दररोज सात ते आठ तासाची झोप आवश्यक आहे. सकाळी उठून थोडा फुफुसांचे व्यायाम करावे, योगा, प्राणायाम, अनुलोम, विलोम प्राणायाम करावेत. दिवसभरात आहारात पाण्याचे प्रमाणात व्यवस्थित असावे. क जीवनसत्व असलेले निंबू वर्गीय फळे, नारळाचे पाणी घ्यावे, सकारात्मक विचार करावे. आपल्या कुटुंबाना वेळ द्यावा, आपल्या डोक्यातील विचार तणावपूर्ण असले तरी ते शेअर करा, कुणाशीही बोला, आपल्यासाठी छंद जोपासावा, छंदाच्या गोष्टीवर फोकस करा, कोरोनामुळे इंटरनेचा वापर वाढला पण तो गरजेपुरताच ठेवा, मानसिक आरोग्य जपण्यासाठी घता संवाद करणे गरजेचे आहे, असे मनोविकार तज्ज्ञ डॉ. यामीनी अविनाश येळणे म्हणाल्या.
......
योगाकडे वाढला सर्वांचा कल
कोरोनाने जगाला विळख्यात घेतल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी सर्वांनी योग करणे आवश्यक आहे. अनुलोम, विलोम, कपालभाती, भ्रामरी, उज्जई प्राणायाम हे कोरोना मिटविण्यासाठी फायदेशिर आहेत. नियमीत व्यायाम केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. योगाकडे आता आकर्षण म्हणून पाहिले जाते. कोरोनामुळे योगाला आणखीणच महत्व आले. प्रत्येक माणूस योगाकडे वळत आहे. जीवनात योगातून सुखमय जीवन, निरोगी जीवन जगता येते असे याेग व निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. माधुरी दीपक परमार म्हणाल्या.
......