लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून येथील वीर बिरसा मुंडा अनुदानित आश्रमशाळेत कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. रामटेके यांनी इमारतीची पाहणी करून संस्थेचे सचिव राजेंद्र बडोले यांच्याशी चर्चा करून सदर इमारतीत कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचे निश्चित केले. सदर इमारत लोक वस्तीपासून दूर असून निसर्गरम्य अशा वातावरणाचा आनंद घेण्यात येतो. सर्व सुविधायुक्त ८० खाटांची व्यवस्था येथे करण्यात आली असून ३ शिफ्टमध्ये डॉक्टर, नर्स व कर्मचारी २४ तास सेवा देणार आहेत. या कोरोना केअर सेंटरची पाहणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक व तालुका व्यवस्थापन समिती अधिकाऱ्यांच्या पथकाने केली आहे. तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ.पी.एस.रामटेके यांच्या मार्गदर्शनात डॉ. चव्हाण, डॉ.सिंग, डॉ. सुरेखा मानकर, डॉ.बघेले,नारायण नाईक, एएनएम रीना बहेकार, आरती ठाकरे व अन्य कर्मचारी सेंटरमध्ये सेवा देतील.
कोरोना केअर सेंटर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. रामटेके यांनी इमारतीची पाहणी करून संस्थेचे सचिव राजेंद्र बडोले यांच्याशी चर्चा करून सदर इमारतीत कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचे निश्चित केले. सदर इमारत लोक वस्तीपासून दूर असून निसर्गरम्य अशा वातावरणाचा आनंद घेण्यात येतो.
कोरोना केअर सेंटर सज्ज
ठळक मुद्देसुसज्ज इमारतीत ८० खाटांची व्यवस्था । २४ तास देणार डॉक्टर, नर्स व कर्मचारी सेवा