कोरोनामुळे गुन्हेगारही घरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST2021-04-29T04:22:06+5:302021-04-29T04:22:06+5:30
गोंदिया : कोरोनाची धास्ती सर्वसामान्यांपासून तर गुन्हेगारांपर्यंत सर्वांनाच बसली. कोरोनाचा जसाजसा संसर्ग वाढत गेला तसातसा चोरी, घरफोडी, खून, खुनाचा ...

कोरोनामुळे गुन्हेगारही घरबंद!
गोंदिया : कोरोनाची धास्ती सर्वसामान्यांपासून तर गुन्हेगारांपर्यंत सर्वांनाच बसली. कोरोनाचा जसाजसा संसर्ग वाढत गेला तसातसा चोरी, घरफोडी, खून, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, बलात्कार या घटनांमध्येही झपाट्याने घट दिसून आली. सन २०१९ मध्ये खुनाच्या घटना ३७ घडल्या होत्या. सन २०२० मध्ये कोरोनामुळे दोन महिने लॉकडाऊन असल्याने खुनाच्या ३३ घटना घडल्या आहेत. खुनाचा प्रयत्न सन २०१९ मध्ये १७ होते ते सन २०२० मध्ये १४ झाले. जबरी चोरी सन २०१९ मध्ये २९ होते ते सन २०२० मध्ये ८ झाले. दिवसा घरफोडी सन २०१९ मध्ये १४ होते ते सन २०२० मध्ये ५ झाले. रात्री घरफोडी सन २०१९ मध्ये १४६ होते, ते सन २०२० मध्ये ७५ झाले. विनयभंग सन २०१९ मध्ये १५१ होते, ते सन २०२० मध्ये ८४ झाले. बलात्कार सन २०१९ मध्ये ६५ होते, ते सन २०२० मध्ये ५० झाले. प्रत्येक गुन्ह्यात घट झाल्याचे चित्र २०२० मध्ये दिसले. दोन ते तीन महिने लॉकडाऊन असल्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. परंतु समाजव्यवस्था बळकट होण्याची चिन्हे या कोरोनामुळे दिसून आली आहेत. सन २०२१ मध्येही एप्रिल महिन्यात संचारबंदी राहिली. लोक घरातच राहिल्याने गुन्हे कमी झाले. चोरी, जबरी चोरी, घरफोडी, बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न हे गुन्हे अत्यल्पच राहिले. चोऱ्यांचे प्रमाण अत्यंत नगण्य राहिले. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत फक्त ३० चोऱ्या जिल्ह्यात झाल्या आहेत.
.........
चोरीच्या घटना
सन २०१९- १८९
सन २०२०-१०२
सन २०२१-३०
.........
खुनाच्या घटना कमी
सन २०१९ मध्ये खुनाच्या घटना ३७ घडल्या होत्या. सन २०२० मध्ये कोरोनामुळे दोन महिने लॉकडाऊन असल्याने खुनाच्या ३३ घटना घडल्या आहेत. सन २०१९ च्या तुलनेत सन २०२० मध्ये चार खून कमी झाले आहेत, तर खुनाचा प्रयत्न सन २०१९ मध्ये १७ होते ते सन २०२० मध्ये १४ झाले. खुनाचे तीन प्रयत्नांचे गुन्हे कमी झाले आहे.
........
१५ बलात्कार झाले कमी
गोंदिया जिल्ह्यात कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊनमुळे विनयभंगाचे ६७, तर बलात्काराचे १५ गुन्हे कमी झालेत. सन २०१९ मध्ये १५१ होते ते सन २०२० मध्ये ८४ झाले. बलात्कार सन २०१९ मध्ये ६५ होते ते सन २०२० मध्ये ५० झाले. यंदाच्या तीन महिन्यांतीलही गुन्हे कमीच आहेत.
.....
कोट
कोरोनामुळे जास्तीत जास्त पोलीस रस्त्यावर आहेत. जिल्ह्यात सन २०१९ च्या तुलनेत सन २०१९ मध्ये व सन २०२१ च्या तीन महिन्यांत गुन्ह्यांमध्ये मोठी घट आहे. पोलिसांची सतर्कता यामुळे गुन्हे कमी होत आहेत. गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असते. रात्रपाळीतही गुन्हेगार चेकिंग करून रस्त्यावर किंवा वस्त्यांमध्ये संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर वेळीच पोलीस कारवाई करतात यामुळे गुन्हे कमी होत आहेत.
महेश बनसोडे, पोलीस निरीक्षक, गोंदिया शहर