डेंग्यूला वेळीच नियंत्रित करण्यासाठी सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 01:36 IST2016-05-20T01:36:42+5:302016-05-20T01:36:42+5:30
जागतिक डेंग्यू दिवस साजरा $$्निेगोंदिया : एका डासापासून होणार डेंग्यू हा आजार वेळीच काळजी न घेतल्यास जीवावर बेततो.

डेंग्यूला वेळीच नियंत्रित करण्यासाठी सहकार्य करा
गहलोत यांचे आवाहन : जागतिक डेंग्यू दिवस साजरा $$्निेगोंदिया : एका डासापासून होणार डेंग्यू हा आजार वेळीच काळजी न घेतल्यास जीवावर बेततो. त्यामुळे या आजाराची वेळीच रोखधाम करणे गरजेचे असून यासाठी डासांची उत्पत्ती होऊ न देणे हे गरजेचे आहे. करिता डेंग्यूच्या रोकथामासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांनी केले.
जिल्हा आरोग्य प्रशासनाच्यावतीने बुधवारी (दि.१८) जिल्हा परिषद आरोग्य भवन सभागृहात आयोजीत ‘जागतीक डेंग्यू दिन’ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक जिल्हा हिवताप अधिकारी बींझाडे, साथरोग अधिकारी डॉ. पटले, गुप्ता, बिसेन, आरोग्य विस्तार अधिकारी दिलीप कुंभरे, ठाकुर, शुक्ला वानखेडे व बहुसंख्येत आरोग्य सहायक सहाय्यीका आरोग्य कर्मचारी-अधिकारी हजर होते.
प्रास्ताविक मार्गदर्शन करताना बिंझाडे यांनी, जिल्ह्यातील मागील ३ वर्षात जिल्ह्यातील डेंग्यू नियंत्रण कार्यक्रमात आकडेवारी समाधानकारक असली तरी यंदाच्या पावसाळ्याच्या अंदाजावरुन यावर्षी डेंग्यू सदृश्य रुग्णाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे निदर्शनात आणून दिले. मागील वर्षी डेंग्यू रोगाचे एकही रुग्ण जिल्ह्यात न आढळून आल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व कर्मचारी-अधिकारी वर्गाचा प्रयत्नाबद्दल त्यांचा अभिनंदन करुन सम्मानित नागरिकांचे आभार व्यक्त केले. संचालन जिल्हा हिवताप कार्यालयाचे किटक समाहरक किशोर भालेराव यांनी केले. आभार आत्माराम वंजारी यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील आरोग्य सहाय्यक, सहाय्यीका तसेच आरोग्य अधिकारी, तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा हिवताप कार्यालय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)