समाज विकासात महिलांचे योगदान पुरुषांच्या बरोबरीने ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:27+5:302021-02-05T07:49:27+5:30
बिरसी-फाटा : आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन यासह महिला विमान उडवत आहेत व ...

समाज विकासात महिलांचे योगदान पुरुषांच्या बरोबरीने ()
बिरसी-फाटा : आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन यासह महिला विमान उडवत आहेत व रेल्वे चालवित आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक कामात महिला बरोबरीने कार्य करीत आहेत. समाजविकासात महिलांचे योगदान पुरूषांच्या बरोबरीने असल्याचे प्रतिपादन वडेगावच्या सरपंच तुमेश्वरी बघेले यांनी केले.
तिरोडा तालुकास्तरीय महिला मंडळाच्यावतीने महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम तसेच महिला संवाद कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य सुनीता मडावी, उपसरपंच मीनाक्षी जगने, ग्रामपंचायत सदस्य स्वर्णमाला साखरे, निकिता धुर्वे, अहिल्या भेलावे, लक्ष्मी चौधरी, के.पी.वरथी, पंचायत समितीच्या माजी सदस्य यमू नंदेश्वर, ग्रामपंचायत सदस्य सत्यशीला ठाकरे, दिलेश्वरी गौतम, मंदा टेंभेकर, वंदना वालदे, शामलाल बिसेन, बेगन अंबुले, रविकांता ठाकरे, रुषन पटले, अनिता बघेले, मंजूषा चव्हाण, सुनीता भालेराव, प्रिया खंडारे, कल्याणी डोंगरे, उज्वला टेंभेकर, सोनिया शहारे, रूपलता जांभुळकर, वंदना पंधरे, रेखा बांते, रजनी आत्राम, मोरेश्वरी पटले, सुनंदा बोळणे, मिनाक्षी बोपचे, रजनी मुळे उपस्थित होते. कार्यक्रमात महिलांनी विविध गीत आणि उखाणे सादर केले. संचालन अनिता बघेले यांनी केले. प्रास्ताविक यमू नंदेश्वर यांनी मांडले. आभार रुषन पटले यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्याच्या विविध भागातील महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी शाहीन पठान, वीणा डोंगरे, सरिता बंसोड, ताशिका भगत, शोभा रहांगडाले, उज्ज्वला जनबंधू, वैशाली रहांगडाले, ममता पटले, सरिता नंदेश्वर, गीता कठाणे, लता वाघाये, आशा रहांगडाले, संगीता रहांगडाले, देविका पटले, किरण रहांगडाले, अस्मिता रहांगडाले यांनी सहकार्य केले.