कंत्राटी कर्मचारी नियुक्तीपासून वंचित

By Admin | Updated: September 4, 2014 23:54 IST2014-09-04T23:54:57+5:302014-09-04T23:54:57+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनांतर्गत काम करणाऱ्या तांत्रीक अधिकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती न दिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारिची पाळी आली आहे.

Contractual employee deprived of appointment | कंत्राटी कर्मचारी नियुक्तीपासून वंचित

कंत्राटी कर्मचारी नियुक्तीपासून वंचित

गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनांतर्गत काम करणाऱ्या तांत्रीक अधिकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती न दिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारिची पाळी आली आहे.
सण २००७ पासून तांत्रीक अधिकारी म्हणून कंत्राटी तत्वावर अनेकांना नियुक्त केले. त्यानंतर याच कर्मचाऱ्यांना १ मे २००१ पासून कार्यप्रारंभ आदेश बाह्यसंस्थेमार्फत दिले जात आहे. शासन निर्णय २०१० च्या मार्गदर्शक सूचनानुसार घेण्यात आले. त्यात अभियंता पदविकाधारक, कृषी पदविकाधारक यांना नियुक्ती देण्यात आली. परंतु आता पदविकाएवजी फक्त पदविधारक असे बाह्यसंस्थेचे म्हणणे आहे. परंतु शासन निर्णय क्रमांक मग्रारा रोहयो २०१०/प्र. क्र.७ रोहयो-१० अ दि. ५ एप्रिल २०११ या निर्णयाची अवहेलना होणार नाही. असे या शासन निर्णयात नमुद केले आहे. तांत्रीक अधिकारी यांना सामाजिक व भौगोलिक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा तसेच कामाची गुणवत्ता व पुर्वानुभव लक्षात घेवून जाणकार उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने अट शिथील करावी. असे नमूद असतानाही पुर्वी काम करणाऱ्या तांत्रीक अधिकाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले. त्यांना काढण्याचे कसलेही पत्र नसताना वरिष्ठ अधिकारी व संस्थेमार्फत शासनाची दिशाभूल करुन त्यांना कामावरुन कमी केले आहे. तांत्रीक अधिकाऱ्यांवर उपासमारिची पाळी आली आहे.

Web Title: Contractual employee deprived of appointment