कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By Admin | Updated: December 24, 2015 01:57 IST2015-12-24T01:57:19+5:302015-12-24T01:57:19+5:30

भारत संचार निगम लिमिटेडमध्ये कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या कामगारांचा गेल्या पाच महिन्यांपासून पगार न झाल्याने...

Contract Workers Movement | कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

बीएसएनएल : पाच महिन्यांपासून पगार नाही
आरमोरी : भारत संचार निगम लिमिटेडमध्ये कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या कामगारांचा गेल्या पाच महिन्यांपासून पगार न झाल्याने त्रस्त झालेल्या कामगारांनी १९ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
या संदर्भात बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, देसाईगंज सर्कल अंतर्गत आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची येथे कंत्राटी कामगार म्हणून बीएसएनएलमध्ये आम्ही काम करीत आहेत. या कामगारांना आॅगष्ट महिन्यापासून वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी सुद्धा अंधारात गेली, चार ते पाच महिन्यांपासून परिवार चालविणे, मुलांचे शिक्षण आदीबाबत प्रचंड अडचणी येत आहेत. यासंदर्भात वारंवार जिल्हा प्रबंधक कार्यालयाला पाठपुरावाही केला. परंतु केवळ टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे १९ डिसेंबरपासून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय आम्ही घेत आहो, असे असे दिगंबर खरकाटे, खुशाल कुथे, अरुण देशमुख, विलास भोयर, नामदेव बोरकर, सुभाष देशकर, हिवराज पारधी, अविनाश चौधरी, सुरेश नंदेश्वर , फिरोज पठान , विशेष वाटघगुरे यांनी म्हटले आहे.
बीएसएनएल कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे दुर्गम भागात सेवेवर परिणाम झाला असून बीएसएनएलच्या जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Contract Workers Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.