प्रवेशाची अनैसर्गिक स्पर्धा सुरू

By Admin | Updated: June 28, 2015 01:14 IST2015-06-28T01:14:38+5:302015-06-28T01:14:38+5:30

सन २०१५-१६ या वर्षात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांकडे शाळांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.

Continuing unmarked competition | प्रवेशाची अनैसर्गिक स्पर्धा सुरू

प्रवेशाची अनैसर्गिक स्पर्धा सुरू

स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल शहराकडे
गोंदिया : सन २०१५-१६ या वर्षात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांकडे शाळांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. पटसंख्येपेक्षा अधिकचा प्रवेश दिला जातो. त्यामुळे त्या वर्गात बसण्यास विद्यार्थ्यांना जागा राहात नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील शाळेत धाव घेत असल्याने शहरात प्रवेश घेण्याची अडचण तर ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची वाणवा अशी समस्या निर्माण झाली आहे.
शहरात चांगले शिक्षण मिळते याच धारणेतून ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील शाळेत आपल्याला प्रवेश मिळावा यासाठी धाव घेतो. त्यामुळे शहरात प्रवेशाची अनैसर्गीक स्पर्धा सुरू होते. शहरातील शाळाांत निर्माण होत असलेली गर्दी रोखण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना यावर आळा घालण्यासंदर्भात पत्र दिले आहे. शहराकडे प्रवेशासाठी धाव असते मात्र ग्रामीण भागातील तुकड्यांतील प्रवेश क्षमता पुर्ण होत नाही. शहरातील शाळांनी प्रवेश देताना इतर शाळांच्या प्रवेशाचा विचार करूनच प्रवेश द्यावा असे शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्रातून सूचविले आहे. क्षमतेपेक्षा अधिक लोकांना प्रवेश द्यायचे असल्यास त्यासाठी शिक्षण उपसंचालकांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. गोंदिया जिल्ह्यात प्रवेश क्षमतेच्या तुलनेत दोन हजार विद्यार्थी अधिक पास झाले. परंतु त्यांना प्रत्येक शाळेत २० विद्यार्थी प्रमाणे प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे शिक्षकही अतिरिक्त होणार नाही. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामीण भागांतही इंग्रजीचे ‘फॅड’
कुऱ्हाडी : शहराबरोबरच आता ग्रामीण भागांतही इंग्रजी शिक्षणाचे ‘फॅड’ दिसून येत आहे. यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे दिसून येत आहे.
इंग्रजी शिक्षणाने मराठी शाळांवर गाज पाडली आहे. सर्वांनाच आपली मुले फाडफाड इंग्रजी बोलणारी हवी अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच आपल्या मुलांना इंग्रजी ़शिक्षण झेपणार की नाही याकडे लक्ष न देता साधारण कुटुंबातील पालक वर्ग सुद्धा आपल्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत न शिकविता इंग्रजी शाळेत शिकविण्याची ईच्छा व्यक्त करीत आहे. त्यांचा मार्ग सुकर करण्यासाठी संस्थाचालकांनी गावागावांत कॉन्व्हेंट उघडल्या आहेत.
कुऱ्हाडी, कवलेवाडा, चोपा, कालीमाटी, गणखैरा, गिधाडी, मुंडीपार या गावातही कॉन्व्हेंट पोहचल्या असून पालकांना आकर्षित करीत आहेत. परिणामी त्यामुळे गावातील प्राथमिक शाळा ओस पडू लागल्या आहेत. पाच विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक अशी काही शाळांची स्थिती झाली आहे. शासकिय कर्मचारी आपल्या पाल्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवित आहेत. त्यामुळे हायस्कुलच्या विद्यार्थी संस्खेतही घट झाली असून काही तुकड्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशात जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमध्ये शिकविण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता व कॉन्व्हेंटच्या शिक्षणाऐवजी गावातील शाळेत शिकविण्याची मानसिकता पालकांच्या मनात येणे अत्यंत गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Continuing unmarked competition