गडमाता देवस्थान परिसरात उद्यान निर्मितीला सुरुवात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST2021-07-31T04:29:03+5:302021-07-31T04:29:03+5:30
याप्रसंगी ठाणेदार प्रमोद बघेले, नगरपंचायत बांधकाम सभापती उमेदलाल जैतवार, शंकरलाल अग्रवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी. के. मेंढे, गडमाता ट्रस्टचे ...

गडमाता देवस्थान परिसरात उद्यान निर्मितीला सुरुवात ()
याप्रसंगी ठाणेदार प्रमोद बघेले, नगरपंचायत बांधकाम सभापती उमेदलाल जैतवार, शंकरलाल अग्रवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी. के. मेंढे, गडमाता ट्रस्टचे अध्यक्ष सावलराम बहेकार, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, सामाजिक कार्यकर्ता महेश असाटी, रमेश अग्रवाल, काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विजय फुंडे, एपीजे फ्युचरा कॉन्व्हेंटचे संचालक शैलेश बहेकार, डॉ. सेवईकर, शंकर राव, महेंद्र कापसे, बबलू शिवणकर, विनय शर्मा, निलेश बोहरे, गडमाता ग्रीन व्हॅली समितीचे सर्व सदस्य व माँ गडमाता सेवा समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकातून ग्रीन व्हॅली समितीचे सदस्य संजय बारसे यांनी, येथे सुंदर उद्यान साकारले जाणार असून भविष्यात खुल्या मैदानात व्यायामाची विविध साधने उपलब्ध केली जाणार. त्याचबरोबर वाचनालय, योग साधना कक्ष, जलपर्णी वनस्पतींचे कुंड व कॅन्टीन सुविधा उपलब्ध केली जाईल असे सांगितले. यासाठी स्थानिक प्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा ही व्यक्त केली.