शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे सदोष बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 9:22 PM

स्थानिक पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तालुक्यातील पालांदूर (जमी.) येथे पूरक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत १ कोटी ४ लाख ३० हजार १७५ रुपये खर्चाची नळ योजना सन १६-१७ मध्ये मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अंदाजपत्रकाने प्रमाणे १९ लाख रुपये खर्चून चुंभली नदीच्या तिरावर विहिरीचे बांधकाम करण्यात आले.

ठळक मुद्देविहीर खचण्याची शक्यता : कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : स्थानिक पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तालुक्यातील पालांदूर (जमी.) येथे पूरक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत १ कोटी ४ लाख ३० हजार १७५ रुपये खर्चाची नळ योजना सन १६-१७ मध्ये मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अंदाजपत्रकाने प्रमाणे १९ लाख रुपये खर्चून चुंभली नदीच्या तिरावर विहिरीचे बांधकाम करण्यात आले. परंतु सदर विहिरीचे बांधकाम तांत्रीकदृष्ट्या योग्य नसल्याने ती एका बाजूला झुकल्याने नदीच्या प्रवाहाने पूर्णत: कोलमडण्याची शक्यता आहे. या प्रकाराला पूर्णपणे कंत्राटदार व संबंधित अभियंता दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतने केली आहे.तालुक्यातील पालांदूर (जमी.) येथे तयार होणाऱ्या पूरक नळयोजनेचे पाणी नागरिकांना मिळणार होते. परंतु ज्या विहीरीतून पाण्याचा उपसा करुन पुरवठा करावयचा होता. ती विहीरच सदोष असल्याने १ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित अभियंत्याने २० फुट व्यासाठी विहिरीचे बांधकाम करताना वरच्या भागाला १९.६ व्यासाची रिंग तयार केली.परिणामी विहिरीचे बांधकाम एका बाजुला झुकले असून ती कोसळण्याची सुध्दा शक्यता नाकारता येत नाही. गावकऱ्यांनी ही बाब सदर कंत्राटदार आणि अभियंत्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी विहिरीला दोरीने बांधून जेसीबी, पोकलॅड सारख्या यंत्राने सरळ करुन देण्याच्या आश्वासन दिल्याने गावकरी सुध्दा विचारात पडले आहे. पैसे वाचविण्यासाठी कंत्राटदारांनी विहिरीचा व्यास वरील भागाला कमी घेतल्याचे बोलल्या जाते.विहिरीचे सदोष बांधकाम करणाºया कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे व अभियंत्यावर निलबंनाची कारवाही करून विहीर बांधकाचा खर्च वसूल करण्याची मागणी पालांदूर (जमी.) येथील नागरिकांची एकमुखी मागणी आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई