रक्तगट विलगीकरण भवनाचे बांधकाम थंडबस्त्यात
By Admin | Updated: December 21, 2014 23:02 IST2014-12-21T23:02:14+5:302014-12-21T23:02:14+5:30
बाई गंगाबाई महिला रूग्णालयातील ब्लॅड बँकेचे विस्तारित भवनासाठी शासनाने ३५ लाख रूपये मंजूर केले आहे. याला रक्तगट विलगीकरण भवन नाव देण्यात आले आहे. त्यासाठी तीन महिन्यांपूर्वीच

रक्तगट विलगीकरण भवनाचे बांधकाम थंडबस्त्यात
गोंदिया : बाई गंगाबाई महिला रूग्णालयातील ब्लॅड बँकेचे विस्तारित भवनासाठी शासनाने ३५ लाख रूपये मंजूर केले आहे. याला रक्तगट विलगीकरण भवन नाव देण्यात आले आहे. त्यासाठी तीन महिन्यांपूर्वीच सदर रक्कम मिळाली आहे. परंतु गंगाबाई महिला रूग्णालय व बांधकाम विभाग या दोघांच्या ढिसाळ कार्यप्रणालीमुळे बांधकाम अद्यापही थंडबस्त्यात आहे.
जवळपास तीन महिन्यांपूर्वीच बाई गंगाबाई महिला रूग्णालयाच्या ब्लड बँकेसाठी रक्तगट विलगीकरणाच्या नावावर शासनाने ३५ लाख रूपये मंजूर केले आहेत. सदर रक्कम बांधकाम विभागाच्या खात्यात जमे करण्यात आली आहे. याबाबत एक प्रस्ताव बनवून बाई गंगाबाई महिला रूग्णालयाच्या वतीने बांधकाम विभागास देण्यात आले आहे. परंतु बाई गंगाबाई महिला रूग्णालयाकडून ढिसाळपणा दाखविला जात आहे. दोन्हीकडून रक्तगट विलगीकरण भवन बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकारांमुळे लवकर भवन बणून लोकसेवेसाठी उपलब्ध होईल, असे दिसून येत नाही.
बाई गंगाबाई महिला रूग्णालयाचा ब्लड बँक इमारतीच्या वरच्या माळ्यावर आहे. या इमारतीला लागूनच दुसऱ्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले तरच योग्य ठरेल. याचे कारण म्हणजे जिथे रक्ताचा साठा होतो, तिथेच रक्तगट विलगीकरणाची प्रक्रिया केली जाते.
ही इमारत जवळच असेल तर काम करणे सोपे होईल. कारण त्यासाठी वेगळ्या रक्त संक्रमण अधिकाऱ्याची नियुक्ती अशक्य आहे. एकच रक्त संक्रमण अधिकाऱ्याला दोन्ही काम सांभाळाले लागतील. यासाठी दोन्ही इमारती जवळ व एकदुसऱ्याशी लागून असणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेवून बीजीडब्ल्यू व्यवस्थापनाच्या वतीने जिथे रूग्णालयाच्या वरील माळ्यावर ब्लड बँक आहे, त्या जवळची जागा प्रस्थावित केली आहे.
या ठिकाणी आधीपासूनच सूर्याच्या किरणांद्वारे पाणी गरम करण्यासाठी मोठमोठ्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. या टाक्या हटविण्याची प्रक्रिया आधी करणे गरजेचे आहे. या दिशेने आतापर्यंत रूग्णालय प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही.
थंडीच्या ऋतूत रूग्णालयात भरती रूग्णांसाठी गरम पाण्याची व्यवस्था असावी, या उद्देशाने सदर टाक्या तिथे स्थापित करण्यात आल्या. रूग्णालयात चौकशी करण्यात आल्यावर सांगण्यात आले की त्यांना गरम पाणी उपलब्ध होत नाही. अशी परिस्थिती दरवर्षी हिवाळ्यात असते. जेव्हा गरम पाणी उपलब्धच होत नाही तर टाक्या तेथे ठेवण्याचे काहीच औचित्य नाही. तसेच सदर टाक्या इतर दुसऱ्या ठिकाणीसुद्धा लावल्या जावू शकतात. (प्रतिनिधी)