२५५ विहिरींचे बांधकाम अपूर्ण

By Admin | Updated: May 25, 2014 23:42 IST2014-05-25T23:42:32+5:302014-05-25T23:42:32+5:30

लघु पाटबंधारे जिल्हा परिषद विभागाच्या वतीने शेतकर्‍यांच्या शेतीला सिंचन व्यवस्था पुरविण्याकरिता निधी देऊन नाबार्ड योजनेतूनही या विहिरीचे बांधकाम करण्यात येते. वर्ष २00७-0८ पासून आजपावेतो

Construction of 255 wells is incomplete | २५५ विहिरींचे बांधकाम अपूर्ण

२५५ विहिरींचे बांधकाम अपूर्ण

सालेकसा : लघु पाटबंधारे जिल्हा परिषद विभागाच्या वतीने शेतकर्‍यांच्या शेतीला सिंचन व्यवस्था पुरविण्याकरिता निधी देऊन नाबार्ड योजनेतूनही या विहिरीचे बांधकाम करण्यात येते. वर्ष २00७-0८ पासून आजपावेतो जिल्ह्यात एकूण २५५ जवाहर विहीरीचे बांधकाम अपुर्ण असल्याची माहिती आहे. यापैकी १0६ विहीरी आमगाव तालुक्यात अपुर्ण आहेत. गोरेगाव, तिरोडा तालुक्यांनी पूर्णत्वाचा आकडा गाठलेला आहे.

सालेकसा तालुक्यातील २0 विहिरी अपूर्ण आहेत. जवाहर विहिरींसाठी शासनाकडून निधी पुरविला जात असताना काही शेतकरी अनुदान लाटण्याचा प्रकार करीत असल्याची माहिती आहे. सर्व लाभार्थ्यांंच्या अपूर्ण विहिरीची उच्चस्तरीय तपासणी करण्याची मागणी परिसरातील काही नागरिकांनी केली आहे. सालेकसा तालुक्यातील लाभार्थ्यांंना २00७-0८ मध्ये सूरजलाल मेहर साकरीटोला ६८७४९, महादेव मेंढे दुगरूटोला ३६४0४, बालाराम लिल्हारे निंबा ७९२0८, इतका निधी देण्यात आलेला आहे. परंतु यांच्या विहिरी अपुर्ण आहेत. २00८-0९ मधील घनश्याम मोहारे पांढरी १0,000 कठीण दगड लागल्याने रद्द करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे. संतोष विश्‍वकर्मा जमाकुडो ३0 हजार, पुरणलाल मेहरे जमाकुडो ६१ हजार ७0९ रूपये देण्यात आले. परंतु या विहिरी अपूर्ण असल्याची माहिती आहे.

प्रत्येक तालुक्याला ३00 विहीर बांधकामाचे उद्दिष्ट दिले होते. गरजू लोकांना मात्र डावलण्यात आले आहे. एकाच कुटुंबात दोन व्यक्तींना लाभ दिल्याचीसुध्दा माहिती प्राप्त आहे. मार्च २0१४ अखेर अपूर्ण असलेल्या विहिरी हरकु परिहार खोलगड, शिवली मोहारे खोलगड, किशोर डोंगरे खोलगड, दुलीचंद बोपचे खोलगड, राधेलाल परिहार खोलगड, चुन्नीलाल उपराडे खोलगड, चैतराम बहकार गिरोला, अनिता मोहारे कुणबीटोला, प्रदीप चुटे साकरीटोला, लिंबन कापसे बिजेपार, राजेश वाघमारे बिजेपार, रघुनाथ बहेकार रोंढा, प्रकाश भलावी धनसुवा, यशोदा बोहणे कहाली यांची कामे पूर्णत्वास आणण्याकरीता काही ठिकाणी कठीण दगड असल्याची तर काहीनी बोअरवेल करण्याची मागणी केली आहे. गरजूंना जवाहर विहिरीचा लाभ देण्याची मागणी अनेक लोकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Construction of 255 wells is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.