जिल्ह्यात होणार ११२ रस्ते सभागृहांचे बांधकाम
By Admin | Updated: April 24, 2015 01:39 IST2015-04-24T01:39:26+5:302015-04-24T01:39:26+5:30
प्रदीर्घ काळानंतर गोंदिया जिल्ह्याला स्थानिक जनप्रतिनिधीचे पालकत्व मिळाले.

जिल्ह्यात होणार ११२ रस्ते सभागृहांचे बांधकाम
नवेगावबांध : प्रदीर्घ काळानंतर गोंदिया जिल्ह्याला स्थानिक जनप्रतिनिधीचे पालकत्व मिळाले. त्यामुळे पालकमंत्री राजकुमार बडोले हे विकासकामांना गती देतील, अशी अपेक्षा बाळगली जात होती. यानुरूप पालकमंत्री बडोले यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी सुचविलेल्या कामांना ग्रामीण विकास व जलसंधारण विभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती ना.बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली.
जिल्ह्यात २५/१५ या लेखा शिर्षांतर्गत ४.५ कोटींच्या निधीतून जवळपास ११२ विकासांची कामे होणार आहेत. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात ४० विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात जुळणार आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध होणे हे गरजेचे असते. यानुरूप जिल्ह्यातील आमदार व पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी राज्य शासनाकडे अनेक विकासातामक कामे सुचविली होती. याबाबत पालकमंत्री बडोले यांनी शासनाकडे पाठपुरावा करून कामांना मंजुरी मिळवून घेतली आहे.
२५/१५ या लेखा शिर्षकाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ११२ रस्ते व सभागृहाच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता राज्य शासनाच्या ग्रामीण विकास व जलसंधारण विभागाने शासन निर्णय निर्गमित करून दिली आहे.
अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात गोरेगाव तालुक्यातील पाटेकुर्रा, सडक-अर्जुनी तालुक्यातील कोसमघाट, कोसमतोंडी, खोडशिवनी, फुटाळा, राका, मुंडीपार, चिखली, डोंगरगाव, डव्वा, पुतळी, चिंगी, कोहमारा, कोदामेढी, खुर्शीपार, तिडका, पांढरवाणी, पांढरी, परसोडी, सडक-अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताळगाव, बोरी, तिडका, देवलगाव, निमगाव, भरनोली, राजोली, धाबेटेकडी, गवर्रा, बाक्टी, दाभना, देऊळगाव, गौरनगर, सिलेझरी, बोंडगाव, कोरंभीटोला, खामखुर्रा, इटखेडा, वडेगाव-रेल्वे व धाबेटेकडी-आदर्श या गावांसह देवरी तालुक्यातील ५८ लाखांची १७ कामे, आमगाव तालुक्यात १८ लाखांची ७ कामे, सालेकसा तालुक्यात २४ लाखांची ८ कामे, तिरोडा तालुक्यात ४६ लाखांची १५, गोरेगाव तालुक्यात ३० लाखांची ११ कामे व गोंदिया तालुक्यात ७१ लाखांची १४ कामे मंजूर झाली आहेत. ना. बडोले यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात जुळणार आहे. (वार्ताहर)