संविधान मित्र पुरस्कार सोहळा मंगळवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:29 IST2021-01-20T04:29:11+5:302021-01-20T04:29:11+5:30

संविधान मैत्री संघाच्यावतीने यावर्षापासून विविध क्षेत्रात देण्यात येणाऱ्या ‘संविधान मित्र’ पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पात्र व्यक्तींकडून विहित नमुन्यात नामांकन प्रस्ताव मागविण्यात ...

Constitution Friends Award Ceremony on Tuesday | संविधान मित्र पुरस्कार सोहळा मंगळवारी

संविधान मित्र पुरस्कार सोहळा मंगळवारी

संविधान मैत्री संघाच्यावतीने यावर्षापासून विविध क्षेत्रात देण्यात येणाऱ्या ‘संविधान मित्र’ पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पात्र व्यक्तींकडून विहित नमुन्यात नामांकन प्रस्ताव मागविण्यात आले आहे. पुरस्कारासाठी निश्चित केलेल्या पात्रता आणि निकषांनुसार स्पष्ट शिफारसीसह पात्र व्यक्तींचे नामांकन प्रस्ताव शनिवारपर्यंत (दि.२३) संविधान मित्रमंडळाने मागविले आहे. ‘संविधान मित्र’ हा जिल्ह्यातील सार्वजनिकरित्या प्रदान करण्यात येणारा पहिला सन्मान पुरस्कार आहे. या पुरस्कारामध्ये उत्कृष्ट सेवा कार्याला प्राथमिक मान्यता दिली जाणार आहे. कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, आरोग्य चिकित्सा, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, रोजगार, सार्वजनिक व न्यायालयीन कामकाज, नागरी सेवा, पत्रकारिता इत्यादी सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित व विलक्षण कामगिरी-सेवेसाठी हे पुरस्कार प्रदान केले जाईल. जिल्ह्यात नि:स्वार्थ सेवा देणाऱ्या तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या नामांकनासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संविधान मैत्री संघ जनसंपर्क कार्यालय तसेच संयोजक अतुल सतदेवे यांच्याशी संपर्क साधता येईल.

Web Title: Constitution Friends Award Ceremony on Tuesday