वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST2021-06-21T04:20:16+5:302021-06-21T04:20:16+5:30

तिरोडा : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले ...

Congress protests against rising inflation | वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसची निदर्शने

वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसची निदर्शने

तिरोडा : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. याचा तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी निदर्शने करून निषेध नोंदविण्यात आला. तसेच महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले.

तालुका काँग्रेस कमिटीतर्फे राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष राधेलाल पटले, तालुका समन्वय रमेश टेंभरे, तिरोडा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष ओमप्रकाश पटले, तालुका महिला अध्यक्ष पूनम राहंगडाले, विलास मेश्राम, सलामभाई शेख, माणिक झंझाड, दुर्गा कटरे, पंचशीला रामटेके, संगीता केसरिया, बबलू राहंगडाले, गोविंद ठाकरे, रोहित राहंगडाले, दिलीप ढाले, नगरसेवक विजय बंसोड, भूमेश्वर पारधी, संजय जांभूळकर, शिवा यादव, झनक लिल्हारे, ठानीलाल पटले, शैलेश मोहारे, प्रदीप पटले, जितेंद्र बंसोड, लेखराज हिरापुरे, शिवदयाल कटरे, प्रदीप उइके, राजेन्द्र मडावी, ईश्वर कुंभारे, दामू येरपुडे मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Congress protests against rising inflation