काँग्रेसने दिली राजीव सातव यांना श्रद्धांजली ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST2021-05-25T04:33:12+5:302021-05-25T04:33:12+5:30

अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान होते. सातव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना काँग्रेस पदाधिकारी व ...

Congress pays homage to Rajiv Satav () | काँग्रेसने दिली राजीव सातव यांना श्रद्धांजली ()

काँग्रेसने दिली राजीव सातव यांना श्रद्धांजली ()

अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान होते. सातव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी डॉ. किरसान यांनी, सातव हे काँग्रेसचे एक युवा नेते होते. त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात पंचायत समिती सदस्य यापासून केली व सध्या ते राज्यसभा सदस्य होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसवर मोठा आघात झाला असून एक उमदा नेता हरपला, असे मत व्यक्त केले. सभेला काँग्रेसचे प्रदेश सचिव विनोद जैन, अमर वराडे, काँग्रेसचे युवा नेते अशोक गुप्ता, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष ॲड. योगेश अग्रवाल, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष जितेश राणे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेेंद्र कटरे, अल्पसंख्याक विभागचे जिल्हाध्यक्ष परवेज बेग, दिलीप गौतम, राजीव ठकरेले, गंगाराम बावनकर, नीलम हलमारे, गुडडा लिल्हारे, सचिन मेश्राम, राजकुमार पटले, लोकनायक रहांगडाले, विक्की नागफासे, योगराज पाचे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Congress pays homage to Rajiv Satav ()