काँग्रेसचे एकदिवसीय धरणे आंदोलन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:27 IST2021-03-28T04:27:35+5:302021-03-28T04:27:35+5:30
केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच पारित केलेल्या काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील तमाम शेतकऱ्यांनी देशव्यापी आंदोलन उभारले आहे. काँग्रेस पक्षाने ...

काँग्रेसचे एकदिवसीय धरणे आंदोलन ()
केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच पारित केलेल्या काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील तमाम शेतकऱ्यांनी देशव्यापी आंदोलन उभारले आहे. काँग्रेस पक्षाने त्यांना सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शंभर दिवस लोटले असून याकडे केंद्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. नवीन कामगार कायद्यामुळे कामगार वर्गामध्ये संताप व्याप्त आहे. दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे, वाढत्या पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. त्यामुळे जनता त्रस्त आहे. याविरोधात धरणे आंदोलन व उपोषण करण्यात आले. तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले, माजी जिल्हा परिषद सदस्य पी.जी. कटरे, झामसिंग बघेले, खिरचंद येळे, राहुल कटरे, पी.सी. चव्हाण, शशी भगत, के. टी. राऊत, मनोज वालदे, नीरज धमगाये, रमेश वट्टी आदी या आंदोलनात सहभागी झाले.