कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा तहसीलवर हल्ला
By Admin | Updated: December 3, 2014 22:53 IST2014-12-03T22:53:27+5:302014-12-03T22:53:27+5:30
धानाला तीन हजार रूपये भाव देण्यात यावा यासह जवखेडा येथील दलीत हत्याकांडाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्यावतीने १ डिसेंबर रोजी

कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा तहसीलवर हल्ला
गोरेगाव व तिरोडा तालुका
गोरेगाव : धानाला तीन हजार रूपये भाव देण्यात यावा यासह जवखेडा येथील दलीत हत्याकांडाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्यावतीने १ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन पुकारले होते. त्यानुसार जिल्ह्यातील गोरगाव व तिरोडा तालुक्यातील कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले.
या आंदोलनांतर्गत पदाधिकाऱ्यांनी निदर्शने देत सरकारला धारेवर धरले. धानाला एक हजार ३६० रूपयांऐवजी तीन हजार रूपये भाव देण्यात यावा तसेच जवखेडा येथील जाधव या दलित परिवारातील तिहेरी हत्याकांड उलगडले नसल्याने प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा मागण्यांसाठी यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन पुकारले होते.
त्यानुसार कॉंगेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर निदर्शने देत आंदोलन केले. तसेच नायब तहसीलदार बी.के. शर्मा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष हेमेंद्र रहांगडाले, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. झामसिंग बघेले, जिल्हा महासचिव पी.जी. कटरे, जिल्हा महासचिव विशाल शेंडे, मानीक बिसेन, सुरेश चन्ने, अरविंद फाये, सी.टी. चोधरी, सुजीत हरिणखेडे, राहुल कटरे, देवचंद कुंभलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तिरोडा तालुका
तिरोडा : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, दलीत अत्याचाराच्या वाढत्या घटनांना वाचा फोडण्यासाठी व भारतीय जनता पक्षाच्या असंवैधानिक सरकारच्या निषेधार्थ तालुका क्राँग्रेस कमिटीच्यावतीने तहसिलदार संजय नागटिळक यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
या निवेदनात, दुष्काळग्रस्त कोरडवाहु शेतकऱ्यांना नुकसानाचा मोबदला अर्जुनपर्यंत मिळालेला नाही. याची दक्षता घेऊन २५ हजार प्रति हेक्टर मोबदला त्वरीत देण्यात यावा. शेतकऱ्यांचे कृषी विद्युत बिल सरसकट माफ करण्यात यावे. व्यापाऱ्यांकडून धानाला हमी भावापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी व सध्या असलेला एक हजार ३६० रुपये हमी भाव वाढवून दोन हजार ५०० रूपये द्यावा, शेतकऱ्यांचे भूमिधारी वर्ग २ चे रुपांतर वर्ग १ मध्ये करावे. निराधार योजनेचे मानधन वेळेवर देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
काँग्रेस कमिटिचे तालुकाध्यक्ष राधेलाल पटले यांच्या मार्गदर्शनात पंचायत समिती सदस्य रमेश पटले, शोभेलाल दहिकर, अमृतलाल असाटी, माणिक झंझाड, जमईवार, विलास मेश्राम, पटले, सुशिल कुंभारे, अनिल कटरे, दिनेश हरिणखेडे, शिवकुमार पाटिल, प्रदिप रोकडे, शिवदासलाल कटरे, राम रहांगडाले, महेंद्र भगत, हितेंद्र जांभूळकर तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थिती निवेदन देण्यात आले.