काँंग्रेसने महिलांना सक्षम केले
By Admin | Updated: December 4, 2015 02:00 IST2015-12-04T02:00:48+5:302015-12-04T02:00:48+5:30
चूल आणि मूल यापर्यंत मर्यादीत असलेल्या महिलांच्या उत्थानासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. घराच्या चौकटीबाहेर न पडणाऱ्या महिलांसाठी ....

काँंग्रेसने महिलांना सक्षम केले
उषाताई मेंढे यांचे प्रतिपादन : मेळाव्यात महिलांची भरगच्च उपस्थिती
गोंदिया : चूल आणि मूल यापर्यंत मर्यादीत असलेल्या महिलांच्या उत्थानासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. घराच्या चौकटीबाहेर न पडणाऱ्या महिलांसाठी बचत गटासारखी सोय करून त्यांना बँकेचा व्यवहारही काँग्रेसने शिकविला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी मागील ६० वर्षापासून काँग्रेसने मेहनत घेतल्यामुळे महिला आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे उद्गार जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी व्यक्त केले.
शहराच्या कन्हारटोली येथील पोवार बोर्डीग येथे काँग्रेसचा जिल्हा महिला मेळावा गुरूवारी घेण्यात आला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास ४ हजार महिला यात सहभागी झाल्या होत्या.
मेळाव्याचे उद्घाटन काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष चारूलता टोकस यांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे अतिथी म्हणून आ.गोपालदास अग्रवाल, माजी आ.रामरतन राऊत, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, जि.प.च्या माजी अध्यक्ष रजनी नागपुरे, गोरेगाव नगर पंचायतीच्या अध्यक्ष सीमा कटरे, अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतीच्या अध्यक्ष पौर्णिमा शहारे, आमगाव पंचायत समितीच्या सभापती हेमलता डोये, जि.प.चे आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे, भंडाऱ्याचा महिला काँग्रेस अध्यक्षा सीमा भुरे, अॅड.के.आर.शेंडे, झामसिंग बघेले, रामलाल राऊत, पी.जी.कटरे, अशोक लंजे, प्रकाश रहमतकर, उषा शहारे उपस्थित होते.
जि.प.अध्यक्ष मेंढे पुढे म्हणाल्या, राजीव गांधीनी महिला आरक्षणाला सुरूवात केली. गांधी परिवारानी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बलिदान ही दिले. गांधी परिवाराचा वारसा पुढे नेण्यासाठी देशाचे नेतृत्व सोनिया गांधीनी स्विकारले. महिलांच्या उत्थानासाठी प्रत्येक क्षेत्रात त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या. ५० टक्के आरक्षण देने ही काँग्रेसची देण आहे. ६० वर्षात चूल आणि मूल यातच खपलेल्या महिलांच्या सर्वागिण विकासासाठी काँग्रेसने प्रयत्न केल्यामुळे महिलांनी सर्वच क्षेत्रात उडी घेतली आहे. भाजपने मतदारांना खोटे आमिष देऊन केंद्र व राज्यात सरकार स्थापन केली. परंतु खोट्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे जनतेने त्यांना आता जागा दाखविणे सुरू केले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व नगर परिषदांच्या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस आघाडीवर आहे.
यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काँग्रेसने कोणते-कोणते उपक्रम अंमलात आणले त्याची इत्यंभूत माहिती उपस्थित महिलांना दिली.
कार्यक्रमाचे संचालन गोंदियाच्या पं.स.सभापती स्नेहा गौतम, प्रास्ताविक माजी सभापती सरिता अंबुले यांनी केले. याप्रसंगी आमगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, तिरोडा, गोरेगाव व गोंदिया या आठही तालुक्यातील महिला या मेळाव्याला सहभागी झाल्या होत्या. यावेळी उपस्थित अतिथीचे समयोचित मार्गदर्शन झाले. (तालुका प्रतिनिधी)