कॉंग्रेसने सर्वांना दिला राजकीय अधिकार

By Admin | Updated: December 25, 2016 02:05 IST2016-12-25T02:05:54+5:302016-12-25T02:05:54+5:30

भारतीय लोकतंत्राला कॉंग्रेस पक्षाने दिलेल्या ताकतीचे परिणाम आहे की, चहा विक णारा देशाचा प्रधानमंत्री बनू शकला

Congress gave political rights to all | कॉंग्रेसने सर्वांना दिला राजकीय अधिकार

कॉंग्रेसने सर्वांना दिला राजकीय अधिकार

नितीन राऊत : कॉंग्रेस कार्यकर्ता संमेलन उत्साहात
गोंदिया : भारतीय लोकतंत्राला कॉंग्रेस पक्षाने दिलेल्या ताकतीचे परिणाम आहे की, चहा विक णारा देशाचा प्रधानमंत्री बनू शकला.कॉंग्रेसने सर्वसामान्यांना राजकीय ताकतीचा अधिकार दिला. मात्र मोदी कॉंग्रेसने ६० वर्षात काय दिले हेच सांगत फिरत आहेत. ज्या तंत्रज्ञानावर त्यांना कौतूक येत आहे ते मागील ६० वर्षात कॉंग्रेसच्या अनुसंधानचे परिणाम असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आयोजीत कॉंग्रेस कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, प्रदेश कमिटी सचिव विनोद जैन, पृथ्वीपालसिंह गुलाटी, पी.जी.कटरे, जहीर अहमद व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. राऊत यांनी, विदेशातून काळा धन आणून देशाची अर्थव्यवस्था सुधारणे व अच्छे दिन आणून देशात खुशहाली आणण्याच्या गोष्टी केवळ घोषणाच बनून राहिल्या. तर आज देशातील सर्वसामान्य माणूस आपलेच रूपये असूनही चोर साबीत होत असल्याचे मत व्यक्त केले.
आमदार अग्रवाल यांनी, येत्या ८ तारखेला होत असलेल्या निवडणुकीला घेऊन कार्यकर्त्यांत नवचेतनेचा संचार करणे हे या संमेलनाचे उद्ेश असल्याचे सांगीतले. तर बींदल प्लाझा मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेच्यावेळी भाजप प्रशासनतील एकही जबाबदार व्यक्ती घटना बघण्यासाठीही पोहचला नाही. अशा भ्रष्ट व सर्रास गुंडागर्दी करून शांत म्हटल्या जाणाऱ्या गोंदिया शहाराला खराब करण्याचे काम केले जात असल्याचे मत व्यक्त करीत आता त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असल्याचे मत व्यक्त केले.
संचालन शहर महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार शहर महिला अध्यक्ष योजना कोतवाल यांनी केले. याप्रसंगी लोकसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष प्रफूल अग्रवाल, जिल्हा महिला अध्यक्ष उषा शहारे, जि.प.सभापती विमल नागपूरे, पंचायत समिती सभापती स्नेहा गौतम, डॉ. नामदेव किरसान, एनएसयुआय अध्यक्ष संदीप रहांगडाले, सभापती हिरालाल फाफनवाडे, जलील पठाण, अरूण दुबे, धनलाल ठाकरे, ओमी बग्गा, सुनिल भालेराव, दिपक नशिने, निता पटले, सरिता कापगते, अमर रंगारी, कविता बनकर, कोयल बिसेन, नफीस सिद्धीकी, शिनू राव, दिपा तिवारी, पौर्णिमा रामटेक्कर व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Congress gave political rights to all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.