गोंदियात काँग्रेस साफ तर भाजपला अति आत्मविश्वास नडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 06:00 AM2019-10-26T06:00:00+5:302019-10-26T06:00:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजप विरुध्द अपक्ष उमेदवार अशीच लढाई होती. तर ...

Congress clean while BJP did not have much confidence in Gondia | गोंदियात काँग्रेस साफ तर भाजपला अति आत्मविश्वास नडला

गोंदियात काँग्रेस साफ तर भाजपला अति आत्मविश्वास नडला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजप विरुध्द अपक्ष उमेदवार अशीच लढाई होती. तर काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. तो अंदाज निवडणुकीच्या निकालानंतर खरा ठरला. काँग्रेसने नवखा उमेदवार दिल्याने या उमेदवाराला केवळ ८ हजारावर मते घेण्यात यश आले. त्यामुळे काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसचा सुपडा साफ झाला. तर भाजपने आपण कोणताही उमेदवार दिला तरी तो निवडून येईल असा अति आत्मविश्वास नडल्याने अपक्ष उमेदवार निवडून आला.
महाराष्टÑ राज्याच्या स्थापनेपासूनच हा मतदारसंघ अस्तीत्वात आला. १९६२ मध्ये महाराष्टÑात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या मतदारसंघातून भारतीय राष्टÑीय काँग्रेसचे उमेदवार मनोहरभाई पटेल हे पहिले आमदार म्हणून निवडून आले. गोंदिया विधानसभा मतदारसंघ अस्तीत्त्वात आला. मतदारसंघ अस्तीत्त्वात आल्यापासून या मतदार संघातून शिवसेनेचे रमेश कुथे वगळता काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला आहे. काँग्रेसचे तत्कालीन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी १५ वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्त्व केले. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजप प्रवेश करीत भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक लढविली. मागील पंधरा वर्षे त्यांनी या मतदारसंघात केलेली विकास कामे आणि त्यांचा व्यापक जनसंर्पक त्यांच्या विचारधारेशी जुळलेले लोक साथ देतील या भरोश्यावर त्यांनी भाजपकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. तर भाजपने सुध्दा त्यांना ऐनवेळी या मतदारसंघातून पक्षातील इच्छुक उमेदवाराला डावलून उमेदवारी दिली.भाजपची लहर आणि आपण जो उमेदवार देऊ तो निवडून येईल,असा मुख्यमंत्र्याचा अति आत्मविश्वासामुळेच भाजपला या निवडणुकीत पराभव पत्थकारावा लागला. पक्षाने ऐनवेळी उमेदवारी डावलल्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना भाजपमधून उघडपणे नव्हे मात्र अंतर्गत मदत मिळाली. तर पक्षाने काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या गोपालदास अग्रवाल यांनी संधी दिल्याने भाजपचे जिल्ह्यातील नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद होती. निवडणुकी दरम्यान पक्षाचा आदेश मानत हे पदाधिकारी जरी गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचारार्थ मतदारसंघ पिंजून काढतांना दिसत होते. मात्र मनाने ते किती सोबत होते हे निवडणुकीच्या निकालानंतर दिसून आले. भाजपमधील अंतर्गत नाराजी,विनोद अग्रवाल यांना पक्षाने डावलल्याची बाब आणि काँग्रेसने अमर वºहाडे यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला दिलेली संधी या गोष्टी अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या पथ्यावर पडल्या. मतदारसंघात सहानुभूतीची लहर चालल्याने विनोद अग्रवाल यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

काँग्रेसचा दारुण पराभव
गोंदिया विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता या मतदारसंघावर सर्वाधिक काळ काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेचे रमेश कुथे वगळता इतर पक्षाच्या उमेदवाराला या मतदारसंघात थारा मिळाला नाही. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. मात्र या निवडणुकीत काँग्रेसने नवखा उमेदवार दिल्याने या उमेदवाराला केवळ ८ हजारावर मते घेत समाधान मानावे लागले.अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांना १ लाख २९९६ तर भाजपचे गोपालदास अग्रवाल यांना ७५ हजार १५४ मिळाली तर काँग्रेसचे अमर वºहाडे यांना ८ हजार मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे काँग्रेसचा या मतदारसंघात दारुन पराभव झाला.
मतदारांची प्रथमच अपक्षाला साथ
गोंदिया विधानसभा मतदारसंघाचा मागील ४७ वर्षांचा इतिहास पाहता या मतदारसंघातून भाजप आणि अपक्ष उमेदवार निवडून आलेला नाही.पण या निवडणुकीत प्रथमच या मतदारसंघातील मतदारांनी अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांच्यावर विश्वास व्यक्त केल्याने अपक्ष उमेदवार निवडून येण्याचा या मतदारसंघात इतिहास झाला.

Web Title: Congress clean while BJP did not have much confidence in Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.