शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

कृषी विधेयक विरोधात काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 5:00 AM

सन २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांचे सशक्तीकरण करणार असल्याचे म्हटले होते. परंतु त्यांनी केलेली घोषणा केवळ पोकळ आश्वासन ठरले. शेतकऱ्यांना बळकट करण्याऐवजी थोड्या उद्योगपतींना खुश करून शेतकऱ्यांना उद्योगजकांचे गुलाम करणारे विधेयक आणले आहे. शेतकरी विरोधी हे विधेयक भाजपशासीत केंद्र सरकारद्वारे हिटलरशाही पद्धतीने पारित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देबैलगाडी घेऊन एसडीओ कार्यालयावर धडक : राष्ट्रपतींना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयक पारित केल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात युवक कॉँग्रेसच्यावतीने सोमवारी (दि.२८) शहरात आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनांतर्गत आंदोलनकर्ते बैलगाडी व ट्रक्टर घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धकडले व उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.सन २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांचे सशक्तीकरण करणार असल्याचे म्हटले होते. परंतु त्यांनी केलेली घोषणा केवळ पोकळ आश्वासन ठरले. शेतकऱ्यांना बळकट करण्याऐवजी थोड्या उद्योगपतींना खुश करून शेतकऱ्यांना उद्योगजकांचे गुलाम करणारे विधेयक आणले आहे. शेतकरी विरोधी हे विधेयक भाजपशासीत केंद्र सरकारद्वारे हिटलरशाही पद्धतीने पारित करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांच्या हिटलरशाहीमुळे देशातील लोकांवर जिएसटी, नोटबंदी, सीएए लादण्यात आले. लॉकडाऊनमुळे देशातील गोरगरीब, छोटे-मध्यम व्यापारी व सुशिक्षीत तरूणांच्या नोकऱ्या गेल्या.देशाच्या आर्थीक व्यवस्थेचा कणा तुटला आहे. आता शेतकºयांची कंबर मोडण्यासाठी शेतकरी विरोधी विधेयक मोदी सरकारने आणले आहे. या विधेयकामुळे देशातील शेतकरी भयभित असल्याचे निवेदनात नमूद आहे. उपविभागीय अधिकारी सवरंगपते यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव अमर वºहाडे, जिल्हाध्यक्ष डॉ. एन.डी. किरसान, तालुकाध्यक्ष सुर्यप्रकाश भगत, शहर अध्यक्ष जहिर अहमद, जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष आलोक मोहंती, दलेश नागदवने यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बैलगाडी व टॅक्टर घेऊन धडककॉँग्रेसने केलेल्या या आंदोलनांतर्गत शहीद भोला भवन येथून बैलगाडी व ट्रॅक्टर घेऊन कॉँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांसह निघाले. गांधी प्रतिमा चौक, गोरेलाल चौक, जमनालाल बजाज पुतळा व नेहरू चौक होत सरकार विरोधी घोषणा देत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले.