लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यात रब्बी धानाच्या उत्पादनापेक्षा शासकीय धान खरेदी केंद्रावर अधिक धान खरेदी झाल्याची बाब नुकतीच उघडकीस आली. यानंतर याची अधिक खोलात जावून चौकशी केली असता काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना आमीष दाखवून त्यांचे सातबारा गोळा करून आणि त्यांच्या कोऱ्या विड्रॉल फार्मवर स्वाक्षऱ्या घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे धान खरेदीत बराच घोळ असल्याची बाब आता पुढे आली आहे.शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीची कमाल मर्यादा हेक्टरी ४० क्विंटल असली तरी दलाल व काही व्यापारी सातबाऱ्यावर किमान ५० क्विंटल धानाची नोंद करुन घेतात. त्यानंतर धानाचे चुकारे लवकरात लवकर मिळावे यासाठी सुद्धा ते तगादा लावीत असल्याची माहिती आहे. ज्या शेतकऱ्यांकडून सातबारा घेतात किंवा ज्या शेतकऱ्याच्या नावाने स्वत:च तलाठ्याकडून सातबारा घेत असल्याचे बोलले जाते. ज्या शेतकऱ्याचा सातबारा घेतला असेल त्या शेतकऱ्याची विड्रॉल फॉर्मवर आधीच सही घेवून ठेवतात. पैसे विड्रॉल करताना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून बँकेचे पासबूक सुद्धा आपल्याजवळ आधीच ठेवतात.त्यामुळे त्यांना बँकेतून पैसे काढणे सोपे जाते. शासनाने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले. मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांना अधिक होत असल्याची बाब आता लपून राहिली नाही. व्यापारी खरेदी केंद्रावर आपली सेटींग करुन शेतकऱ्यांकडून कमी दराने धानाची खरेदी करुन त्याची विक्री करतात.यासाठी व्यापारी शेतकऱ्याला सातबाऱ्याची मागणी करताना त्याला बोनसची रक्कम देण्याचे आमीष दाखवितो. याला काही शेतकरी बळी पडतात. याचाच फायदा घेत व्यापारी शेतकऱ्याच्या नावावर आपला धान खरेदी केंद्रावर विक्री करतात. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदी दरम्यान गोळा केलेले सातबारा तपासणी केल्यास यातील खरा घोळ सहज बाहेर येईल. याची चौकशी करण्यासाठी नेमका कोण पुढकार घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जमीन कितीही असली तरी चालेलएखाद्या शेतकºयाकडे समजा दीड एकर शेती असली तर त्याच्या सातबाऱ्यावर ०.६० आर असे लिहिले असते. काही व्यापारी याला १.६० हे. आर करुन टाकतात व आपला जास्तीत जास्त धान विक्री करतात. व्यापारी किमान ५० क्विंटल पेक्षा जास्त धानाची विक्री प्रत्येकी एका सातबाऱ्यावर करतो. खरेदी केंद्रावरील लोकांशी संगणमत करुन लवकरात लवकर धान खरेदीची नोंदणी व चुकारे लवकर जमा करण्यासाठी सुद्धा सेटिंग करतो. खातेदाराशिवाय रक्कम विड्रॉल करता येत नाही. मात्र व्यापारी ही बाब सुद्धा बरोबर जुळवून घेत असल्याचे बोलले जाते.बोनसची काही रक्कम शेतकऱ्यालामागील वर्षी प्रती ५० क्विंटल धानामागे २५ हजार रुपये बोनस निघाला त्यापैकी व्यापाऱ्याने सातबारा धारक शेतकऱ्याला पाच हजार रुपये देवून बाकीचे २० हजार आपल्या खिशात टाकले. यंदा प्रती ५० क्विंटल मागे बोनसची रक्कम ३५ हजार झाली. त्यापैकी शेतकरी कशा स्वभावाचा आहे हे बघून ५ ते १० हजारापर्यंत त्याला देऊन स्वत: २५ ते ३० हजार आपल्या जवळ ठेवले. असाच गोरखधंदा व्यापारी मागील २-३ वर्षांपासून करीत आहे. मात्र याकडे सर्वांनीच डोळेझाक केली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.
सातबाराच्या आधारे धान खरेदीत घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST
शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीची कमाल मर्यादा हेक्टरी ४० क्विंटल असली तरी दलाल व काही व्यापारी सातबाऱ्यावर किमान ५० क्विंटल धानाची नोंद करुन घेतात. त्यानंतर धानाचे चुकारे लवकरात लवकर मिळावे यासाठी सुद्धा ते तगादा लावीत असल्याची माहिती आहे. ज्या शेतकºयांकडून सातबारा घेतात किंवा ज्या शेतकऱ्यांच्या नावाने स्वत:च तलाठ्याकडून सातबारा घेत असल्याचे बोलले जाते.
सातबाराच्या आधारे धान खरेदीत घोळ
ठळक मुद्देकोऱ्या विड्रॉलवर शेतकऱ्यांची स्वाक्षरी : चौकशीसाठी कोण घेणार पुढाकार