पोटनिवडणुकीचा संभ्रम अजूनही कायम

By Admin | Updated: March 30, 2016 02:10 IST2016-03-30T02:10:36+5:302016-03-30T02:10:36+5:30

शहरातील प्रभाग क्रमांक १ साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रकरणात न्यायालयाडून आता गुरूवारी (दि.३१) सुनावणी होणार आहे.

The confusion of by-elections is still intact | पोटनिवडणुकीचा संभ्रम अजूनही कायम

पोटनिवडणुकीचा संभ्रम अजूनही कायम

गुरूवारी सुनावणी : सर्वांचे लक्ष लागले
गोंदिया : शहरातील प्रभाग क्रमांक १ साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रकरणात न्यायालयाडून आता गुरूवारी (दि.३१) सुनावणी होणार आहे. या ‘तारीख पे तारीख’मुळे शहरवासीयांची या पोटनिवडणुकीला घेऊन उत्कंठा वाढली आहे. न्यायालय या प्रकरणात काय निर्णय सुनावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील नगरसेवक अनिल पांडे यांचा मृत्यू झाल्याने रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र पोटनिवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक १ च्या मतदार यादीत लगतच्या प्रभाग क्रमांक २ मधील सुमारे २७०० मतदारांचा एक भाग जुळला आहे. त्यामुळे या प्रकरणाला घेऊन नगर परिषदेत वातावरण तापले आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणाला घेऊन प्रभाग क्रमांक १ चे सदस्य व सभापती बंटी पंचबुध्दे न्यायालयात गेले आहेत. या प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी (दि.२२) राज्य निवडणूक आयोगाला काय ते निर्णय घेण्याच्या सूचना करीत सोमवारची (दि.२८) तारीख दिली होती. मात्र सोमवारच्या (दि.२८) सुनावणीनंतर आता या प्रकरणाला घेऊन गुरूवारी (दि.३१) सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. या पोटनिवडणुकीकडे अगोदरच शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. त्यात आतापर्यंत दोन तारखा होऊन आता तिसरी तारीख मिळाल्याने निर्णयाची उत्कंठा लागली आहे. (शहर प्रतिनिधी)

रिंगणात आता नऊ उमेदवार
प्रभाग क्रमांक १ साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत ११ उमेदवारांचे १५ अर्ज आले होते. यात चार उमेदवारांनी दोन अर्ज टाकले होते. त्यांनी ते अर्ज मागे घेतल्याने तसेच सचिन रमेश गोटेकर व पदमाकांत इंद्रराज चौधरी या दोघांचे दोन अर्ज छाननीत कापले गेले. त्यामुळे आता रिंगणात नऊ उमेदवार उरले आहेत. यात विनायक नत्थू खौरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), राजू विठ्ठलराव पारधी (भारतीय जनता पक्ष), लोकचंद सोमाजी रहांगडाले (कॉंग्रेस), दीपक सुधाकर बोबडे (शिवसेना), उमेश मनोहर दमाहे (अपक्ष), संदीप माणिकराव पटले (अपक्ष), नागेश्वर राजेश दुबे (अपक्ष), विलास बाबूलाल मेश्राम (अपक्ष) व राहूल टेकचंद फेंडारकर (अपक्ष) यांचा समावेश आहे.

Web Title: The confusion of by-elections is still intact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.