केंद्रीय शिक्षण परिषदेची सांगता
By Admin | Updated: September 30, 2016 01:59 IST2016-09-30T01:59:09+5:302016-09-30T01:59:09+5:30
पंचायत समिती अंतर्गत सोनपुरी केंद्राचे केंद्रीय शिक्षण परिषदेचे आयोजन स्वामी विवेकानंद हॉयस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सोनपुरी येथे

केंद्रीय शिक्षण परिषदेची सांगता
शिक्षकांना नवीन दर्जा : वेळेवर येऊन शिक्षणदान करा
सोनपुरी : पंचायत समिती अंतर्गत सोनपुरी केंद्राचे केंद्रीय शिक्षण परिषदेचे आयोजन स्वामी विवेकानंद हॉयस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सोनपुरी येथे गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सदस्य अर्चना राऊत, एस.जी. टेंभुर्णीकर, डी.पी. पारधी, केंद्रप्रमुख एच.पी. पटले उपस्थित होते.
उपक्रमशील केंद्रप्रमुख एच.पी. पटले यांच्या संकल्पनेतून ‘फूल आणि टाचणी’ उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमात मागील सत्रात सोनपुरी केंद्रात उल्लेखनिय कार्य करणारे शिक्षक आर.जी. टेकाम, व्ही.टी. रक्शे, आर.पी. उरकुडे, एम.एम. राजगिरे, वाय.पी. तुरकर, आर.एस. गणवीर, आर.एम. कोरे, एम.पी. म्यांकलवार, एम.टी. तांडेकर यांचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.
या वेळी पं.स. सदस्य अर्चना राऊत यांनी शिक्षकांनी शाळेत वेळेवर येवून शिक्षण दानाचे पवित्र कार्य नेहमी करावे, असे आवाहन केले. एस.जी. टेंभुर्णीकर म्हणाले, केंद्रीय शिक्षण परिषदेच्या माध्यमाने शिक्षकांना एक नवीन दर्जा निर्माण होईल, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर म्हणाले, केंद्रातील सर्व शिक्षक ज्ञानरत्नवादी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रगत करावे आणि शाळेच्या शैक्षणिक विकासाकरिता परिश्रम, कौशल्य व नियोजनाची आवश्यकता असते म्हणून सर्व शिक्षकांनी कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचे प्रयत्न करावे.
नुकतेच आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित पांढरी शाळेचे शिक्षक आर.जी. टेकाम यांचा शिक्षण परिषदेत शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांनी आपले मतही व्यक्त केले.
प्रास्ताविक केंद्रप्रमुख एच.पी. पटले यांनी केले. शिक्षण परिषदेच्या यशस्वितेसाठी जी.जी. दमाहे, व्ही.व्ही. पिट्टलवार, के.झेड. लिल्हारे, एम.एन. निंबार्क, पी.एम. ढेकवार, कबीर माहुले, के.डी. सोलंकी, कृष्णा कुराहे, टी.ए. आलोत, पी.एम. वालदे, सुनील बहेटवार, आर.एच. नांदणे, एच.एस. वाघमारे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)