संगणकीकृत कामकाजावर बहिष्कार
By Admin | Updated: April 24, 2016 01:52 IST2016-04-24T01:52:43+5:302016-04-24T01:52:43+5:30
तलाठ्यांनी विविध मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन केले. शासनाने तलाठ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे २१ एप्रिलपासून संगणकीकृत...

संगणकीकृत कामकाजावर बहिष्कार
विविध मागण्यांचा समावेश : तलाठ्यांचे धरणे आंदोलन
गोंदिया : तलाठ्यांनी विविध मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन केले. शासनाने तलाठ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे २१ एप्रिलपासून संगणकीकृत कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला. २६ एप्रिलपासून संपूर्ण तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा विदर्भ पटवारी संघातर्फे देण्यात आला.
तलाठी साझ्याची व महसूल मंडळाची पुनर्रचना करणे, मंडळ अधिकारी कार्यालयाचे भाडे देणे, सातबारा संगणकीकरण व ई-फेरफार मधील अडचणी दूर करणे, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौणखनिज वसूली या कामातून तलाठ्यांना वगळणे, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना कार्यालय बांधून देणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पध्दतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे व अंशदायी निवृत्त वेतन योजनेला घेऊन तलाठ्यांचे आंदोलन सुरु करण्यात आले.
या आंदोलनात आर.पी.वैद्य, जिल्हाध्यक्ष एम.एम.लिल्हारे, सचिव बी.डी. भेंडारकर, सहसचिव डी. बी. हत्तीमारे, एन.बी. वर्मा, आर.एस. बोळखे, पी.एस. कुंभरे, डब्ल्यु.एफ. कोहालकर, यु.एस. वाघधरे, सी.एन. सोनवाने, पी.बी. तिवारी, डी.एच. पोरचेट्टीवार, रियाज तुर्क, मनोज पांडे, दिपक नागदेवे, राजेश ठाकरे, आर.एच. मेश्राम, डी.एन. मेश्राम, के.एम. पटले, डी.टी. कठाणे, जी.व्ही. गाढवे, विवेक बाबरे, सुनील राठौड, हेमलाल बिसेन, डी.एम. बनोटे व मंडळ अधिकारी लांजेवार याच्या आंदोलनात समावेश आहे.
राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या बॅनरखाली काही तलाठ्यांनी त्याच मागण्यांना घेऊन संप पुकारला.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय धार्मिक, सचिव महेश कांचनवार, उपाध्यक्ष जे.आर. जांभूळकर, मदन चुरे, राजकुमार भाजीपाले, अजित भोवते, वर्षा वाढई, राजेश मेनन, पी.झेड. बिसेन, आशिष रामटेके, आर.डी. रहांगडाले, एन.के. पराते, एम.एम. शुक्ला, संदीप रहांगडाले, गणेश लाडे, एम.एस.शिवरकर, बडवाईक यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)