गोंदियात बंदला संमिश्र प्रतिसाद
By Admin | Updated: March 18, 2016 02:04 IST2016-03-18T02:04:45+5:302016-03-18T02:04:45+5:30
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पादरम्यान सुवर्ण व्यापारावर लावलेली एक्साईज ड्युटी मागे घेण्याच्या...

गोंदियात बंदला संमिश्र प्रतिसाद
बंदसाठी हुल्लडबाजी : कर्णकर्कश हॉर्नने केले त्रस्त
गोंदिया : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पादरम्यान सुवर्ण व्यापारावर लावलेली एक्साईज ड्युटी मागे घेण्याच्या मागणीसाठी सुवर्ण व्यापाऱ्यांनी केलेल्या बंदच्या आवाहनाला गोंदिया शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
सुवर्णकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शहरात बाईकवर वारंवार फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करावे लागत होते. यावेळी मार्केट लाईनमधून कर्णकर्णश हॉर्न वाजवून त्यांनी व्यापाऱ्यांसह नागरिकांना चांगलेच जेरीस आणले. बंदमध्ये सहभागी होण्यासाठी केलेल्या या हुल्लडबाजीवर अनेक व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. बंद पाळण्याची व्यापाऱ्यांची मनस्थिती नसल्यामुळे अर्धवट शटर उघडून व्यापार सुरूच होते. (जिल्हा प्रतिनिधी)