प्रफुल्ल पटेलांचे विकास व्हिजन पूर्ण करा!

By Admin | Updated: December 29, 2016 01:20 IST2016-12-29T01:20:40+5:302016-12-29T01:20:40+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार

Complete the development vision of Praful Patel! | प्रफुल्ल पटेलांचे विकास व्हिजन पूर्ण करा!

प्रफुल्ल पटेलांचे विकास व्हिजन पूर्ण करा!

राजेंद्र जैन : मामा चौकात राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचा शुभारंभ
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार अशोक (गप्पू) गुप्ता तथा गोंदिया शहरातील सर्व प्रभागातील उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले.
ते मामा चौकात प्रभाग-४ चे उमेदवार सतीश देशमुख व सविता नानू मुदलिया यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले, मागील दोन वर्षात नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी शहराची हालत खराब केली आहे. विपक्षात असताना मोठमोठ्या गोष्टी करणारे सत्तेच्या या दोन वर्षात गोंदिया रेल्वे स्थानकातून न कोणती रेल्वे गाडी चालविली, न कोणत्या गाडीचा थांबा दिला. केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेपासून शहरातील नागरिकांना काहीही लाभ मिळाला नाही. शहरातील रस्त्यांची स्थिती दोन तीन वर्षात दयनिय झाली आहे. खा. प्रफुल्ल पटेल नेहमी विकासाठी सकारात्मक राजकारण करतात. आम्ही कधीही विरोधासाठी विरोध न करता विकासाला प्राधान्य दिले आहे. शहराच्या विकासासाठी खा. पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी अध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक गुप्ता, नगरसेवक पदाचे उमेदवार सतीश देशमुख व सविता नानू मुदलियार यांनी उपस्थितांना संबोधित केले.
निवडणूक प्रचार कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी प्रामुख्याने नरेश माहेश्वरी, विनोद हरिणखेडे, शिव शर्मा, अशोक शहारे, झलक बिसेन, जयंत कछवाह, मनोहर ठाकूर, कुंदा दोनोडे, महेश करियार, गुड्डू बिसेन, प्रीतपाल होरा, साबीर पठान, नानू मुदलियार, शिवराज भेगंडारकर, राकेश तुरकर, प्रदीप ठवरे, लिंबाजी येडे, अहमद मिस्त्री, के.जी. शर्मा, के.आर. पटेल, विजय तोडकर, कटकवार, गेडाम, पिल्लेवार, वंजारी, वसंत सुहाने, श्रावण रामटेके, गणेश राजोडिया, दास अभियंता, मन्नू बिरिया, संजू यादव, नवनीत आगलावे, अनिल गायधने, नमा ब्रह्मा, सुरेश रामटेके, बाल्या केकत, अशोक नशीने, कैलाश वासनिक, महिपाल कामरकर, मारूती येटरे, चंदू मेश्राम, डी.एस. राव, लाल खान, सलामभाई, रफीकभाई, गोविंद नायडू, विनय, विक्टर पाल, अमर जोसेफ, किरण वर्मा, लता मानकर, कुसूम सोनी, राजू सोनी यासह मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

पटेलांचे राजकारण सकारात्मक
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे विकासाचे सकारात्मक राजकारण आहे. ते विरोधासाठी विरोध करीत नाही. तर विकास कामांना प्राधान्य देतात. गेल्या काही काळापासून नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी शहराच्या विकासाची वाट लावली आहे. गोंदिया शहराच्या विकासासाठी नगर परिषद निवडणुकती राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करून प्रफुल्ल पटेल यांचे शहराच्या विकासासाठी हात बळकट करावे, असे आवाहन माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले. पटेल यांच्या बंगला परिसरात नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशोक गुप्ता तथा प्रभाग-११ च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर नरेश माहेश्वरी, विनोद हरिणखेडे, रमेश पटेल, जयेश पटेल, लव धोटे, अंजन नायडू, गिरीश परमार यांच्यासह प्रभाग-११ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मयूर दरबार जाडेजा व पूजा संदीप पटले उपस्थित होते.माजी आ. जैन पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षाच्या काळात नगर परिषदेत पैसे खाण्याशिवाय दुसरे कुठलेही काम झाले नाही.
मोठमोठ्या घोषणा व मोठमोठे आश्वासन देणाऱ्या पक्षाच्या प्रतिनिधींनी शहर विकासाची वाट लावली. गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विकासाचे व्हिजन असलेल्यांना नगराध्यक्ष पदासह प्रभागाची उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यास गोंदिया शहराचा विकासाच्या बाबतीत चेहरा बदललेला असेल, असेही जैन म्हणाले.याप्रसंगी नरेश माहेश्वरी, विनोद हरिणखेडे, जयेश पटेल, लव धोटे, उमेदवार मयूर दरबार, पूजा संदीप पटले यांचीही भाषणे झाली. संचालन रवी मुंदडा यांनी केले. आभार शिव शर्मा यांनी मानले. सभेला अशोक शहारे, डॉ. मृत्यूंजयसिंग, सुरेश लालवानी, बंडू चामट, अल्पेश पटेल, मुकेश पटेल, उर्विल पटेल, पराग पटेल, हरगोविंद चौरसिया, चंदू राय, वामन शहारे, सुरेंद्र लिल्हारे, लखन बहेलिया, विनय पटेल, ईश्वर राव, गिरीश पटले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Complete the development vision of Praful Patel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.