महिला सक्षमीकरण समितीच्या अध्यक्ष व सचिवावर गुन्हा दाखल

By Admin | Updated: July 26, 2016 01:33 IST2016-07-26T01:33:29+5:302016-07-26T01:33:29+5:30

डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राका येथील महिला सक्षमीकरण समितीच्या अध्यक्ष व सचिवावर न्यायालयाच्या आदेशावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The complaint was filed against the president and the secretary of the Women's Empowerment Committee | महिला सक्षमीकरण समितीच्या अध्यक्ष व सचिवावर गुन्हा दाखल

महिला सक्षमीकरण समितीच्या अध्यक्ष व सचिवावर गुन्हा दाखल

गोंदिया : डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राका येथील महिला सक्षमीकरण समितीच्या अध्यक्ष व सचिवावर न्यायालयाच्या आदेशावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ग्राम पंचायत राकाअंतर्गत महिला सक्षमीकरण समितीला ९ सप्टेंबर २००५ ते २०१० या काळात २ लाख १० हजार १२९ रूपये देण्यात आले. त्यातील एक लाख २० हजार रूपयाचा अपहार अध्यक्ष माधुरी संतोष पाथोडे व सचिव प्रमीला तिलकचंद भिवगडे यांनी केला. या प्रकरणावर जिल्हा परिषदेने चौकशी केली. यात त्यांच्यावर वसुली करण्याचे आदेशही काढण्यात आले. त्यांनी त्या रककमेचा भरणाही ग्रा.पं.ला केला. परंतु हा गंभीर स्वरूपाचा गुंञहा असल्याने अश्वीनी अशोक चांदेवार (४१) यांनी या प्रकरणात न्यायालयात धाव घेतली. डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ४०९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The complaint was filed against the president and the secretary of the Women's Empowerment Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.