तक्रारकर्ताच निघाला दरोडेखोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 01:57 IST2016-02-11T01:57:57+5:302016-02-11T01:57:57+5:30

लोहाऱ्यावरुन देवरी मोटारसायकलवर बँकेत पैसे टाकण्याकरिता जातांना दरोडेखोरांनी लुटले असा कांगावा करणारा तक्रारकर्ताच या प्रकरणातील आरोपी निघाला आहे.

The complainant turned out to be the robber | तक्रारकर्ताच निघाला दरोडेखोर

तक्रारकर्ताच निघाला दरोडेखोर

साळ्याने घातला गंडा : सोन्याच्या बिस्किटासाठी रचले नाट्य
गोंदिया : लोहाऱ्यावरुन देवरी मोटारसायकलवर बँकेत पैसे टाकण्याकरिता जातांना दरोडेखोरांनी लुटले असा कांगावा करणारा तक्रारकर्ताच या प्रकरणातील आरोपी निघाला आहे. आपल्या भाऊजीच्या दुकानात काम करणाऱ्या साळ्यावर वाईट व्यसनांमुळे उसणवारी झाली. ती उसणवारी चुकविण्यासाठी त्याने भाऊजीलाच गंडा देण्यासाठी दरोडा झाल्याचे खोटे काल्पनिक नाट्य रचले. परंतु या घटनेचा पर्दाफास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला आहे.
आरोपी श्रीनिवास राजाराम चन्नमवार (३६) हा लोहारा येथील एका हॉटेलमध्ये काम करीत होता. ती बीअरबार त्याचा भाऊजी देवराज गुन्नेवार यांची आहे. दररोजच्या विक्रीचे पैसे बँकेत जमा करण्याचे काम त्याच्याकडे होते. त्याला जुगार, सट्टा, व क्लब अश्या वाईट सवयी लागल्याने त्याने बारचा मालक देवराज गुन्नेवार याच्याकडून ४० हजार रूपये उसनवारीवर घेतले होते.
श्रीनिवास चन्नमवार याला जयपूर वरून सोन्याचे बिस्कीट खरेदी करण्यासाठी काही दिवसापूर्वी फोन आला होता. त्याने त्या सोन्याच्या बिस्कीटला खरेदी करण्यासाठी हे कृत्य केले आहे. त्या सोन्याच्या बिस्कटची व्हीडिओ देखील त्यांने आपल्या व्हॉट्सअपवर मागितली होती.
एकदा तो जयपूरला जाऊन आला. ज्यांच्याशी त्याने सोन्याच्या बिस्कीटचा सौदा केला त्या लोकांनी श्रीनिवासकडून दिड लाख रूपये हिसकावून घेतले होते. व आणखी दिड लाख रूपये आण तरच सोन्याचे बिस्कीट देऊ असे सांगितले होते. त्यासाठी श्रीनिवास दिड लाख रूपये जमविण्याच्या प्रयत्नात होता. घटनेच्या दिवशी रोकड लिहीणाऱ्या व्यक्तीला माझ्यावर असलेले मालकाचे ४० हजार रूपये आज बँकेत टाकतो ते लिहून घे असे त्याने बार मधील नोकराला सांगितले. त्यानंतर बारमधील १ लाख ३५ हजार ९१० रूपये घेऊन सोमवारी सकाळी ११ वाजता देवरीला जाण्यास निघाला. त्याने त्या रकमेची विल्हेवाट लावण्यासाठी बोरगावच्या जंगलात आपली दुचाकी लावली त्यावेळी लोकांनी त्याला पाहिले. दरोडा घातल्याचा कांगावा केला तर ते सर्व पैसे आपल्याला होतील.
भाऊजीचे पैसे असल्याने आपल्यावर संशयदेखील होणार नाही म्हणून श्रीनिवासनने दरोडा झाल्याची काल्पनिक घटना रचली. त्याच्या जवळ कवडी नाही मग उसनवारीचे ४० हजार टाकणार कुठून, असा संशय देखील त्याच्या नातेवाईकांना आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण नावडकर, उपनिरीक्षक प्रकाश पाटील, सहाय्यक फौजदार सुधीर नवखरे, हवालदार रामलाल सार्वे, लिलेंद्र बैस, संतोष काळे, धनंजय शेंडे, राजकुमार खोटेले, शहारे व वाहन चालक सयाम, लांजेवार यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)

श्रीनिवासकडून १ लाख ३५ हजार ९१० जप्त
दुकानातून नेलेल्या १ लाख ३५ हजार ९१० रूपयापैकी ५२ हजार रूपये श्रीनिवासने पुराडा येथील मित्र सुभाष पुनाराम शेंडे याच्याकडे ठेवायला दिले होते. तर ८३ हजार ९१० रूपये त्याने स्वत:च्या घरी ठेवले होते. सदर रक्कम पोलिसांनी पंचासमक्ष त्याच्याकडून जप्त केली.
असा आला गुन्हा उघडकीस
आरोपीने दिलेल्या प्रत्येक माहितीची नोंद पोलिसांनी आपल्या वहीत घेतली. ज्या चारचाकी वाहनातील लोकांनी लुटले त्या वाहनाच्या मागील भागातील काचावर पांढऱ्या रंगारा मोठा स्टीकर लावला होता असे त्याने सांगितले. त्यातूनच आरोपीने पोलीसांना तपासाची दिशा दिली. आरोपीच्या मोबाईलमध्ये असलेला सोन्याच्या बिस्कीटचा व्हीडीओ पोलीसांनी पाहिल्यावर तो व्हिडीओ डिलीट करा असे त्याने पोलिसांना विनंती केली. त्याने रक्कम बँकेत भरण्यासाठी जाण्यापूर्वी फोन केला होता. तो फोन दुकानातील सिसिटीव्हीत कैद झाला. त्यानंतर ज्याने ज्या ज्या व्यक्तीशी संपर्क केला त्याची माहिती पोलीसांना या कृत्याची तपासाची दिशा देत होती.

त्याने दिली कबुली
फिर्यादीला आरोपी बनविणे ही बाब अत्यंत कठीण असते. परंतु या घटनेमुळे हादरलेल्या पोलिसांनी चहूबाजूने तपास केल्यावर आरोपी म्हणून तक्रारकर्ताच येत होता. परंतु कायद्याच्या चाकोरीत राहून सबळ पुरावा मिळाल्याशिवाय आरोपी कसा करणार हा पोलिसांचा माणस होता. श्रीनिवासला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणून त्याचे बयान घेतल्यानंतर त्याच्यावरच संशयाची सुई जात होती. त्याला विचारतांना त्याने अनेकदा टाळाटाळ करण्याचे उत्तर दिले. मात्र त्याच्या बयानावर वारंवार माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विचारल्यावर त्याने हे कृत्य आपणच केल्याची कबुली दिली. त्याने ५२ हजार रूपये आपल्या पुराडा येथील मित्राकडे ठेवले व ८३ हजार ९१० रूपये घरी ठेवल्याचे सांगितले. ते पैसे पोलिसांनी जप्त केले आहे.

Web Title: The complainant turned out to be the robber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.