तक्रार देण्यासाठी ‘ती’ गेली पिस्तुलसह एसपी कार्यालयात

By Admin | Updated: July 13, 2016 02:25 IST2016-07-13T02:25:18+5:302016-07-13T02:25:18+5:30

पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी व घरगुती कलहाची तक्रार देण्यासाठी एका महिलेने चक्क आपल्या पर्समध्ये पिस्तुल नेल्याचा प्रकार....

To complain 'that' in the SP's office with the last pistol | तक्रार देण्यासाठी ‘ती’ गेली पिस्तुलसह एसपी कार्यालयात

तक्रार देण्यासाठी ‘ती’ गेली पिस्तुलसह एसपी कार्यालयात

घरगुती कलह : सहाय्यक फौजदाराच्या पत्नीचा प्रताप
गोंदिया : पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी व घरगुती कलहाची तक्रार देण्यासाठी एका महिलेने चक्क आपल्या पर्समध्ये पिस्तुल नेल्याचा प्रकार गोंदियात घडला. ही पिस्तुल छर्ऱ्याची असली तरी त्यापासून मानवी जीवास हाणी पोहोचत असल्यामुळे पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही महिला चक्क एका सहायक पोलीस उपनिरिक्षकाची पत्नी आहे.
ही कारवाई सोमवारी सकाळी १०.३० वाजतादरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आली. रजनी नंदनवार (४५) रा.फुलचूरनाका गोंदिया असे त्या महिलेचे नाव आहे. तिचे पती सीएमएस सेलमध्ये सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. घरगुती वादासंदर्भात ती पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करायला गेली होती. परंतु पहारेकरी महिला शिपाई नेताम यांना संशय आल्याने त्यांनी तिच्या पर्सची झडती घेतली असता ती पिस्तुल आढळली. ती जप्त करण्यात आली.
जवळ अशा पद्धतीने पिस्तुल बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे ही बाब आपल्याला माहित नव्हती, असे नंदनवार यांनी पोलिसांना सांगितले. मागील वर्षी ती पिस्तुल त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून पोस्टाने मागविली होती. एका वृत्तपत्रात जाहीरात वाचल्यावर संपर्क साधून आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने ती मागविल्याचे नंदनवार यांनी पोलिसांना सांगितले.
आपण संस्थेचे काम करीत असताना महत्वाचे कागदपत्र आपल्याजवळ राहतात. म्हणून आपले कागदपत्र कुणी हिसकावू नये म्हणून ती पिस्तुल आपण बाळगत होते, ती खऱ्याखुऱ्या गोळ्याची नसून छर्ऱ्यांची पिस्तुल असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांनी नंदनवार यांच्या घरी झडती घेतल्यावर त्या पिस्तुलाचे ८० छर्रे देखील जप्त केले. ती पिस्तुल छर्ऱ्याची असले तरी तिला ट्रीगर असल्यामुळे सदर महिलेवर कारवाई करण्यात आली, असे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले. सदर घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ३, ६, २५ सकलम १३५, महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी तिला न्यायालयात हजर केल्यानंतर जामिनावर सोडण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: To complain 'that' in the SP's office with the last pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.