पोलीस पाटील संघटनेचा सीईओ यांना निरोप
By Admin | Updated: April 24, 2017 00:35 IST2017-04-24T00:35:51+5:302017-04-24T00:35:51+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे जिल्हाधिकारी बुलढाणा येथे स्थानांतरण झाले.

पोलीस पाटील संघटनेचा सीईओ यांना निरोप
गोंदिया : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे जिल्हाधिकारी बुलढाणा येथे स्थानांतरण झाले. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जावून त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.
याप्रसंगी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, जिल्हा अध्यक्ष दिलीप मेश्राम, कार्याध्यक्ष आनंद तुरकर, माजी अध्यक्ष सोमाजी शेंडे, परिमल ठाकूर, डी.जे. पटले, योगराज लंजे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले, जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त पोलीस पाटील कार्य करीत असतात. त्यांचा प्रशासनातील सहभाग वाढविण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तसेच त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. गोंदिया जिल्ह्यातील पोलीस पाटलांप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी कामे करावी, यासाठी मी तेथे पोलीस पाटलांची कार्यशाळा घेणार आहे. त्यासाठी आपल्या संघटनेकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक भृंगराज परशुरामकर यांनी मांडले. संचालन दिलीप मेश्राम यांनी केले. आभार आनंद तुरकर यांनी मानले.(प्रतिनिधी)