शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

फिजिकल डिस्टसिंग ठेवून तेंदूपत्ता संकलनाचे कार्य सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

यावर्षी जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूच्या इफेक्टमुळे तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया उशीरा केली. उशीरा का होईना तेंदूपत्ता कंत्राटदारांना तेंदूपत्ता संकलन करण्याची मंजुरी दिल्याने परिसरातील जंगल व्याप्त केळवद, करांडली, गवर्रा, परसटोला, वारव्ही, चिचोली, गोठणगाव या गावात तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शासनास या तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा महसूल मिळतो.

ठळक मुद्देकंत्राटदारांनी मजुरांना दिला आधार : रोजगार मिळाल्याने मजुरांमध्ये समाधानाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : ‘लॉकडाऊन’मुळे उद्योगधंदे व अन्य कामे बंद पडल्याने मजुरांची चांगलीच अडचण निर्माण झाली. अशात उशीरा का होईना तेंदूपत्ता संकलन करण्यास खाजगी कंत्राटदारांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्याने या परिसरात तेंदूपत्ता संकलन केंद्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले आहे. यामुळे तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना रोजगार मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. प्रत्येक मजुरामध्ये फिजिकल डिस्टंन्सिग ठेवून तेंदूपत्ता संकलनाचे कार्य सुरू आहे.यावर्षी जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूच्या इफेक्टमुळे तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया उशीरा केली. उशीरा का होईना तेंदूपत्ता कंत्राटदारांना तेंदूपत्ता संकलन करण्याची मंजुरी दिल्याने परिसरातील जंगल व्याप्त केळवद, करांडली, गवर्रा, परसटोला, वारव्ही, चिचोली, गोठणगाव या गावात तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शासनास या तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा महसूल मिळतो. तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम जवळपास १ महिना सुरू असतो. या हंगामासाठी या परिसरातील अनेक गावांमधील मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. तेंदूपत्ता हंगामातून प्रत्येक मजुरांच्या कुटुंबाना २० ते ३० हजार रूपयांचा रोजगार मिळत आहे. त्यामुळे तेंदूपत्ता मजुरांना २२० ते २३० रूपये शेकडा प्रमाणे मजुरी प्राप्त होत आहे.या तेंदूपत्ता रोजगारामुळे मजुरांच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक दिसून येत आहे.एकादिवशी फळी मधून ५० हजार तेंदूपत्ता संकलीत केला जात असल्याचे सांगण्यात आले. यासर्व कार्यात ‘फिजिकल डिस्टंन्सिग ठेवून तेंदू पुडे रचतांना मजूर दिसले. या कार्यासाठी प्रत्येक मजूर सकाळीच घरून निघून १-१ पानासाठी पूर्ण जंगल पिंजून काढत आहे.शासनाने विमा कवच द्यावेतेंदूपत्ता संकलनासाठी मजुरांना दिवसभर जंगलात रहावे लागते. तेंदूपत्ता शोधण्यासाठी पूर्ण जंगल पिंजून काढावे लागते. अशात कित्येक मजुरांवर वन्यप्राण्यांनी हल्ला करून ठार केल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडल्या आहेत. यामुळे वन्यप्राण्यांपासून केव्हाही धोका होण्याची भीती त्यांच्या मनात असते. करिता शासनाने तेंदूपत्ता मजुरांसाठी विमा संरक्षण योजना सुरू करावी अशी अपेक्षा मजुरांनी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याforest departmentवनविभाग