दिलासा! एका रुग्णाला दिला डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST2021-12-25T05:00:00+5:302021-12-25T05:00:16+5:30
तब्बल ६ महिन्यांनंतर जिल्ह्यात शनिवारी (दि.११) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली होती. विशेष म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून अंतराने का होईना मात्र १-२ बाधित भर घालत आहेत. मागील मागील ४-५ दिवसांपासून नवीन बाधितांची भर पडलेली नाही. त्यातच शुक्रवारीही एकही बाधित आढळून आला नाही. त्यातच एका ॲक्टिव्ह रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्याने आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २ झाली असून दिलासा मिळाला आहे.

दिलासा! एका रुग्णाला दिला डिस्चार्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून नवीन बाधितांची भर पडलेली नसतानाच शुक्रवारी (दि.२४) सुद्धा नवीन बाधित आढळून आले नसल्याने दिलासा आहे. त्यातच एका ॲक्टिव्ह रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून आता जिल्ह्यात २ ॲक्टिव्ह रुग्ण उरले आहेत.
तब्बल ६ महिन्यांनंतर जिल्ह्यात शनिवारी (दि.११) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली होती. विशेष म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून अंतराने का होईना मात्र १-२ बाधित भर घालत आहेत. मागील मागील ४-५ दिवसांपासून नवीन बाधितांची भर पडलेली नाही. त्यातच शुक्रवारीही एकही बाधित आढळून आला नाही. त्यातच एका ॲक्टिव्ह रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्याने आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २ झाली असून दिलासा मिळाला आहे.
असे असले तरीही आता ओमायक्रॉन हा नवा विषाणू धुमाकूळ घालत असून नागपूरपर्यंत पोहचल्याने नागरिकांनी खबरदारीने वागणे गरजेचे आहे. सध्या नागरिक बेभानपणे वागत असून नियमांना डावलताना दिसत आहेत. मात्र आता कोरोनाला पाय पसरू द्यायचे नसल्यास नियमांचे पालन अतिआवश्यक आहे.
चाचण्यांची संख्या वाढविली
- ओमायक्रॉनच्या धर्तीवर चाचण्यांची संख्या वाढविण्याबाबत आदेश असतानाही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या घटून १०० च्या आता आल्याचे दिसत होते. मात्र गुरुवारपासून त्यात वाढ झाल्याचे दिसते. गुरुवारी चाचण्या घेण्यात आल्या असून यात १९७ आरटी-पीसीआर तर ३३ रॅपिड ॲंटिजन चाचण्या होत्या. आतापर्यंत जिल्ह्यात ४७०७३२ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
लसीकरण हाच पर्याय
- देशात सध्या ओमायक्रॉनची दहशत निर्माण झाली आहे. अशात नागरिकांनी पुन्हा एकदा खबरदारीने वागण्याची गरज आहे. यासाठी नियमांचे पालन करण्यासोबतच लवकरात लवकर लसीकरण करणे गरजेचे आहे. कोरोनाची लस व्यक्तीला गंभीर संसर्ग होऊ देत नसल्याने लसीकरण केल्याशिवाय पर्याय नाही.