युरियासाठी संयुक्त खताची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST2021-08-08T05:00:00+5:302021-08-08T05:00:33+5:30

शेतीच्या वाढत्या लागवड खर्चामुळे आधीच शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच आता खतविक्रेत्या कंपन्याकडून लिकिंग केली जात असल्याने याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आरसीएफ कंपनीकडून युरिया खत घेण्यासाठी १,५१,५१० या संयुक्त खताची सक्ती केली जात असल्याची तक्रार विक्रेते व शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वीच कृषी विभागाकडे केली होती.

Combined fertilizer for urea | युरियासाठी संयुक्त खताची सक्ती

युरियासाठी संयुक्त खताची सक्ती

अंकुश गुंडावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  दरवर्षी खरीप हंगामात खतविक्रेत्या कंपन्याकडून लिंकिंगचा प्रकार केला जातो. यंदा सुद्धा असाच प्रकार जिल्ह्यात सुरू आहे. २५७ रुपयांच्या युरिया खतांवर १,१८५ रुपयांची १,५१,५१० खत घेण्याची सक्ती आरसीएफ कंपनीकडून केली जात असल्याची तक्रार विक्रेत्यांनी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लिंकिंगचा प्रकार सुरूच असल्याच्या प्रकारावर शिक्कामोर्तब झाले आहे. 
शेतीच्या वाढत्या लागवड खर्चामुळे आधीच शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच आता खतविक्रेत्या कंपन्याकडून लिकिंग केली जात असल्याने याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आरसीएफ कंपनीकडून युरिया खत घेण्यासाठी १,५१,५१० या संयुक्त खताची सक्ती केली जात असल्याची तक्रार विक्रेते व शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वीच कृषी विभागाकडे केली होती. यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि सहायक जिल्हा कृषी अधिकारी मडामे यांनी जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र संचालक आणि आरसीएफ कंपनीच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.  यात कृषी केंद्र संचालकांच्या तक्रारीवरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी आरसीएफ कंपनीला स्टॉफ सेलचे आदेश दिले. त्यानंतर मडामे यांनी स्टॉफ सेल केला होता. मात्र शनिवारी (दि.७) आरसीएफ कंपनीची गोंदिया येथे रॅक लागली. तेव्हा कंपनीने पुन्हा विक्रेत्यांना युरिया खत घेण्यासाठी १,५१,५१० या संयुक्त खत घेण्याची सक्ती केली. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला. 
कृषी अधिकाऱ्यांनी खतावरील लिकिंग बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याने विक्रेत्यांनी यावर संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे आरसीएफ कंपनीला स्टॉफ सेलचे आदेश मडामे यांनी दिले होते. त्यानंतर ५ ऑगस्टला मडामे यांनीच आरसीएफ कंपनीला रिलीज ऑर्डर दिले. 
हे रिलीज ऑर्डर देताना त्यांनी वरिष्ठांना विश्वासात न घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विक्रेत्यांनी केली आहे. 

 निर्णय ५ टनाचा वितरण १५ टनचे 
जि. प. कृषी अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत आरसीएफ कंपनीला युरियाची रॅक लागल्यानंतर सर्वच कृषी केंद्र संचालकांना प्रत्येकी पाच टन युरिया खत वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शनिवारी (दि.७) युरिया खताची रॅक लागल्यानंतर या निणर्याचे सुद्धा उल्लंघन करण्यात आले. सडक अर्जुनी तालुक्यातील एका कृषी केंद्राला १५ टन युरिया खताचा पुरवठा केला. कंपनीने हे कुठल्या आधारावर केले याची सुद्धा माहिती नाही. 
 

 

Web Title: Combined fertilizer for urea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती