जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट
By Admin | Updated: March 27, 2017 01:01 IST2017-03-27T01:01:34+5:302017-03-27T01:01:34+5:30
जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी येथील शेतकरी यादोराव बिसेन यांच्या घरी भेट देऊन सेंद्रीय शेती व शेतमाल विक्री या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट
मोहाडी (चोपा) : जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी येथील शेतकरी यादोराव बिसेन यांच्या घरी भेट देऊन सेंद्रीय शेती व शेतमाल विक्री या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी या भेटीत बिसेन यांच्या घरी भेट देऊन जिवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क या सेंद्रीय शेती निविष्ठांची पाहणी केली. तसेच सेंद्रीय शेती करताना शेतमाल विक्रीसाठी येत असलेल्या अडचणींची विचारपूस केली. तसेच सेंद्रीय शेती प्रकल्पांतर्गत गोदाम, वाहतूक, बाजार, बाजारभावाची शासनस्तरावर व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगीतले.
याप्रसंगी त्यांच्यासोबत तहसीलदार कल्याण डहाट, तालुका कृषी अधिकारी वावधने, मंडळ कृषी अधिकारी मेळे, गोंदिया विभाग फारमर्स कंपनीचे अध्यक्ष जितेंद्र बिसेन, नरेश मेंढे, चिराग पाटील कृषी विकास संस्थेचे उमेश गौतम, संस्था समन्वयक हवनलाल लटये, योगेंद्र बिसेन, समुह गट प्रमुख सुरेंद्र मेंढे, उपाध्यक्ष तेजेश्वर डोहळे, गजानन पटले, तलाठी बोरकर होते. (वार्ताहर)