जिल्हाधिकारी खेळले केबीसी
By Admin | Updated: March 13, 2016 02:07 IST2016-03-13T02:07:06+5:302016-03-13T02:07:06+5:30
लोकमत सखी मंच ार्फे आयोजित मै अभिताभ बच्चन बोल रहा हू या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम खेळला.

जिल्हाधिकारी खेळले केबीसी
लोकमत सखी मंच ार्फे आयोजित मै अभिताभ बच्चन बोल रहा हू या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम खेळला. त्यांना पहिला प्रश्न पारिवारीक विचारण्यात आला. आपण सतत व्यस्त असता घरी रात्री उशीरा आल्यावर पत्नीची प्रतिक्रिया कशी असते.? या प्रश्नाला उत्तर देतांना जिल्हाधिकाऱ्यांनी गंमतीदार उत्तर देत स्वयंपाक मीच करतो व दुसऱ्या दिवशी रात्री किती वाजता येईल हे सांगत नाही तेव्हापर्यंत पत्नीचा राग शांत होत नाही असे उत्तर त्यांनी दिले. यावर उपस्थित जनसमुदायाचा हसा पिकला. या प्रश्नाचे उत्तर देतांना जिल्हाधिकारीही सुरूवातीला लाजले होते. परंतु त्यांनी त्या प्रश्नाच्या उत्तराला क्षणाधार्थ आनंदात बदलले. ज्युनियर अभिताभ बच्चन यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन आपण केबीसी जिंकल्याचे जाहीर केले.