सामूहिक विवाह सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे साधन
By Admin | Updated: April 25, 2015 01:15 IST2015-04-25T01:15:01+5:302015-04-25T01:15:01+5:30
आदिवासी हलबा-हलबी समाज संघटना कटंगी व आदर्श सामूहिक विवाह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथील शहीद जान्या-तिम्या विद्यालयाच्या प्रांगणात सामूहिक विवाह सोहळा पार पडला.

सामूहिक विवाह सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे साधन
गोंदिया : आदिवासी हलबा-हलबी समाज संघटना कटंगी व आदर्श सामूहिक विवाह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथील शहीद जान्या-तिम्या विद्यालयाच्या प्रांगणात सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या वेळी डॉ. एन.डी. किरसान यांनी आपल्या मार्गदर्शनात सामूहिक विवाह सोहळे सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे साधन असल्याचे सांगितले.
सदर समिती व संघटना मागील १७ वर्षांपासून आदिवासी सामूहिक विवाह सोहळे संस्थापक डॉ. एन.डी. किरसान यांच्या मार्गदर्शनात सतत घेण्यात येत आहेत. यावर्षी ३० जोडप्यांना विवाहबद्ध करण्यात आले. या सोहळ्यामुळे गोरेगाव येथे जत्रेचे स्वरूप आले होते. समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे ३० जोडप्यांना हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत विवाहबद्ध करण्यात आले.
या वेळी अतिथी म्हणून आ. गोपालदास अग्रवाल, खा. नाना पटोले, आ. विजय रहांगडाले, माजी आ. रामरतन राऊत, खोमेश रहांगडाले, माजी जि.प. अध्यक्ष टोलसिंग पवार, माजी जि.प. सभापती पी.जी. कटरे, श्रावण राणा, माजी पं.स. सभापती झामसिंग बघेले, अमर वऱ्हाडे, लक्ष्मीकांत बारेवार, जि.प. सभापती कुसन घासले, पुरूषोत्तम कटरे, डेमेंद्र रहांगडाले, विशाल शेंडे, विवेक मेंढे, जगन धुर्वे, जगदिश येरोला, मलेश्याम येरोला, पं.स. सभापती चित्ररेखा चौधरी, माजी सभापती जी.आर. गाते, किसन मानकर, ओ.एस. जमदाळ, मनोहरराव चंद्रिकापुरे, तानेश ताराम, मीना राऊत, सी.टी. चौधरी, आरती चव्हारे, जे.टी. दिहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. सामूहिक विवाह सोहळ्यांमुळे समाज एकसंघ राहण्यास व समाजात सलोखा निर्माण करण्यास मदत होते. यामुळे वेळ व पैशाची बचत होते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन मेळाव्याचे आयोजक डॉ. किरसान यांनी केले.
कार्यक्रमासाठी अजय कोठेवार, एच.बी. राऊत, विरेंद्र चाकाटे, मूलचंद खांडवाये, रामचंद्र फरदे, खेमराज भंडारी, सूरज कोयलारे, डेव्हीड राऊत, शिवानंद फरदे, शंकर काठेवार, वाय.सी. भोयर, पी.एफ. खांडवाये, जी.एस. खांडवाये, डी.जी. कोल्हारे, बी.एच. वडेगावकर, मधूकर किरसान, सुनील कोसमे, झामसिंग भोयर, एच.सी. भोयर, एम.आर. राऊत व आदी सर्व समाजबांधव व भगिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले. (प्रतिनिधी)