कोल्हापुरी बंधाऱ्यांची अवस्था झाली जीर्ण
By Admin | Updated: October 12, 2014 23:35 IST2014-10-12T23:35:55+5:302014-10-12T23:35:55+5:30
शासनाने वन विभागाच्या माध्यमातून गावोगावी नाल्यांत पाणी अडवा, पाणी जिरवा या धोरणाचा अवलंब करुन प्रत्येक गावांमध्ये बंधारे निर्माण केले आहेत. मात्र बांधकाम करण्यात आलेले बंधारे निकृष्ट

कोल्हापुरी बंधाऱ्यांची अवस्था झाली जीर्ण
पांढरी : शासनाने वन विभागाच्या माध्यमातून गावोगावी नाल्यांत पाणी अडवा, पाणी जिरवा या धोरणाचा अवलंब करुन प्रत्येक गावांमध्ये बंधारे निर्माण केले आहेत. मात्र बांधकाम करण्यात आलेले बंधारे निकृष्ट बांधकाम व देखभाल दुरूस्ती अभावी जिर्ण झाले आहेत.
मुरपार व डुंडा या गावांमध्ये पाच ते सहा वर्षापूर्वी कोल्हापुरी बंधारे वन विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आले आहे. यामध्ये वन विभागाने कमी प्रमाणात सिमेंटचा उपयोग करुन मोठ्या प्रमाणात नफा कमविलेला दिसत आहे. कारण बंधाऱ्यांना जागो-जागी भेगा पडून पाणी वाहून जात आहे. तर बंधाऱ्याला लावलेले दरवाजे सुद्धा वाहून गेले आहेत. परंतु अजूनपर्यंत वन विभागाने त्या बंधाऱ्यांची दुरुस्ती केलेली दिसत नाही.
पाणी अडवा, पाणी जिरवा या धोरणातून या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र या बंधाऱ्यांत पाणीच अडत नसल्याने या धोरणाचाच फज्जा झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुरपार व डुंडा या नाल्यावर नव्याने बंधाऱ्यांचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)