सीएम चषक हा युवकांची दिशाभूल करणारा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:19 IST2018-12-24T21:19:25+5:302018-12-24T21:19:41+5:30
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते. आता मात्र ते युवकांना पकोडे बनवून रोजगार करायला सांगतात. आता २०१९ मध्ये निवडणुका येत आहेत.

सीएम चषक हा युवकांची दिशाभूल करणारा प्रयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपुरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते. आता मात्र ते युवकांना पकोडे बनवून रोजगार करायला सांगतात. आता २०१९ मध्ये निवडणुका येत आहेत. म्हणून युवकांचा कल आपल्याकडे करुन त्यांना आपल्याकडेच गुंतवून ठेवण्याकरिता सीएम चषक स्पर्धेचे मोठ्या गाज्यावाज्याने आयोजन करण्यात येत आहे. मात्र हा सीएम चषक युवकांची दिशाभूल करणारा प्रयोग असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केला.
येथील स्वदेशी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना पुरस्कार वितरक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती अर्चना राऊत, जि.प.सदस्य विजय टेकाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोपाल तिराले, जिल्हा काँग्रेसचे महासचिव यादनलाल बनोठे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, बाम्हणीचे सरपंच लक्ष्मण नागपुरे, सोनपुरीचे सरपंच संगीता कुराहे, उपसरपंच प्रेमलता देशमुख, तंटामुक्त समिती अध्यक्ष लालदास दसरिया, सोनपुरीचे माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य नेतराम मच्छिरके, काँग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी बलीराम कोटवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश मोहारे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष नरेश राऊत, केंद्रप्रमुख एच.पी. पटले, माजी सरपंच भेंगराज बावनकर उपस्थित होते.
प्रास्ताविक केंद्र कार्यवाह व्ही.एस. येसनसुरे यांनी मांडले. संचालन केंद्राचे तालुका प्रतिनिधी पी.एम. ढेकवार यांनी केले. आभार विषय शिक्षक कबीरदास माहुले यांनी मानले.
कार्यक्रमासाठी केंद्राध्यक्ष व्ही.टी. रक्से, उपाध्यक्ष आर.जे. डहारे, प्रसिद्धी प्रमुख आर.जी. टेकाम, पदविधर शिक्षक आर.एस. बसोने, कार्याध्यक्ष एच.पी. पटले, बी.एम. माहुले, एस.जी. लिल्हारे, के.डी. नवगोडे, आर.एस. वट्टी, एस.पी. बैठवार, एस.एम. दसरिया, व्ही.एस. मानकर, टी.एफ. पारधी, प्रभा गावंडे, सुरेश चव्हाण, रत्नशील गजभिये, व्ही.व्ही. पिठलवार, व्ही.व्ही. बिसेन, आर.एस. वानखेडे, आलोत, एम.एम. राजगिरे, एम.पी. लिल्हारे, आर.एच. लिल्हारे, हेमराज मच्छिरके, राधेशम करमरकर, वोनिषा वैष्णव यांनी सहकार्य केले.