सीएम चषक तरु णांची दिशाभूल करणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:58 IST2018-12-15T00:56:47+5:302018-12-15T00:58:04+5:30
भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी २ कोटी तरूणांना रोजगार देऊ, असे आश्वासन दिले होते. देशाचे पंतप्रधान पकोडे बनवून रोजगार करायला सांगतात. या सरकारने तरू णांचा छळ केला आहे. निवडणुका जवळ येत आहे म्हणून तरूणांचा कौल आपल्याकडे करून व गुंतवून ठेवण्याकरिता सीएम चषक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.

सीएम चषक तरु णांची दिशाभूल करणारा
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी २ कोटी तरूणांना रोजगार देऊ, असे आश्वासन दिले होते. देशाचे पंतप्रधान पकोडे बनवून रोजगार करायला सांगतात. या सरकारने तरू णांचा छळ केला आहे. निवडणुका जवळ येत आहे म्हणून तरूणांचा कौल आपल्याकडे करून व गुंतवून ठेवण्याकरिता सीएम चषक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. मात्र हा सीएम चषक तरूणांची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
तालुक्यातील ग्राम पांढरी येथे मंडई निमित्त आयोजित ‘रु सला पदर मायेचा’ या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी अजय लांजेवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून छाया चव्हाण, नरेश भेंडारकर, डी. यु. रहांगडाले, विशाल शेंदरे, जितेश उजवणे, प्रमिला पटले, विलास बागडकर, देवेंद्र तुरकर उपस्थित होते. पुढे बोलताना चंद्रिकापुरे यांनी, आपण यांची निती समजून घेतली पाहिजे.
या स्पर्धेने आपले भविष्य उज्ज्वल होणार नाही व आपण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जाणार नाही. तरूणांचे भविष्य बनवायचे होते, तर या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना पाठवायला हवे असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित अन्य पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक डी. एन. शेंडे यांनी मांडले. संचालन रु किराम अंबुले यांनी केले. आभार सुरेश शिवणकर यांनी मानले.