दिवाळीनिमित्त गरजूंना ‘वस्त्रदान’
By Admin | Updated: November 11, 2015 01:17 IST2015-11-11T01:17:34+5:302015-11-11T01:17:34+5:30
नवे कपडे व फटाके खरेदी करून दिवाळी साजरी केली जात असतानाच, जेवणाची सोय व दिव्यात घालायला तेलही नसलेला एक दुसरा घटक समाजात वावरतो.

दिवाळीनिमित्त गरजूंना ‘वस्त्रदान’
लोकमत इव्हेंट्सचा पुढाकार : चिमुकल्यांपासून मोठ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
गोंदिया : नवे कपडे व फटाके खरेदी करून दिवाळी साजरी केली जात असतानाच, जेवणाची सोय व दिव्यात घालायला तेलही नसलेला एक दुसरा घटक समाजात वावरतो. त्यांनाही दिवाळी साजरी करण्याचा अधिकार असताना त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांना यापासून दूर ठेवते. मात्र त्यांनाही दिवाळीचा अत्यल्प का होईना मात्र आनंद लाभावा हा उद्देश बाळगून लोकमत इव्हेंट्सच्यावतीने समाजातील अशा गरजूंना ‘वस्त्रदान’ करण्यात आले. लोकमतच्या जिल्हा कार्यालयात मंगळवारी (दि.१०) मोठ्या संख्येत कापड वाटप करण्यात आले. भारावलेल्या डोळ््यांनी गरजूंनी आपल्या चिमुकल्यांपासून ते स्वत:साठी कपडे निवडून घेतले.
कार्यक्रमाच्या उत्स्फुर्त प्रतिसादाकरिता लोकमतच्यावतीने शहरवासीयांना त्यांची जुनी कापड आणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यास शहरवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला.
मोठ्या संख्येत जमा झालेल्या कापडाच्या वाटपासाठी मंगळवारी (दि.१०) गरजूंना कार्यालयात एकत्र क रून कपडे वाटप करण्यात आले. यात प्रफूल ठाकरे, बी.एम.भागवत, तिलकराम बारेवार यांच्यासह अनेकांनी आपले कपडे गरजूंपर्यंत पोहचवून दिले.
लोमकतच्या कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करून जमेल तेवढी रक्कम एकत्रित करून गरजूंना भेट म्हणून दिली.
यावेळी जिल्हा कार्यालय प्रमुख मिलींद वाढई, लोकमत जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, इन्व्हेंट्सचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार, जिल्हा संयोजिका दिव्या भगत, जाहीरात प्रतिनिधी अतुल कडू, छोटी जाहिरात प्रतिनिधी राजीव फुंडे, लोकमत शहर प्रतिनिधी कपिल केकत, तालुका प्रतिनिधी नरेश रहिले, प्रतिनिधी नरेश रहिले, आॅपरेटर पंकज गहरवार आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)