ककोडी ते देवरीमार्गे जड वाहतूक बंद करा
By Admin | Updated: April 30, 2016 01:51 IST2016-04-30T01:51:51+5:302016-04-30T01:51:51+5:30
छत्तीसगड राज्यातील छुरियाकडून ककोडी ते देवरी मार्गे मागील अनेक दिवसांपासून ओव्हरलोड (जड) वाहने परिवहन विभागाचा कर वाचविण्याकरिता या मार्गाने ये-जा करीत आहेत.

ककोडी ते देवरीमार्गे जड वाहतूक बंद करा
सहषराम कोरेटी: तिव्र आंदोलनाचा इशारा
देवरी : छत्तीसगड राज्यातील छुरियाकडून ककोडी ते देवरी मार्गे मागील अनेक दिवसांपासून ओव्हरलोड (जड) वाहने परिवहन विभागाचा कर वाचविण्याकरिता या मार्गाने ये-जा करीत आहेत. त्यामुळे या मार्गाची दुरावस्था झाली आहे. यामुळे या मार्गावर अनेक अपघात होत आहेत. या मार्गावरून होणारी ओव्हरलोड( जड) वाहतूक त्वरित बंद करावी, अशी मागणी गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केली आहे. ही ओव्हरलोड बंद झाली नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस पक्षाकडून देण्यात आला आहे.
छत्तीसगड राज्यातील छुरीयाकडून ककोडी ते देवरी या ३ मिटर रूंदीच्या डांबरीकरणाच्या मार्गे अनेक दिवसापासून ४० ते ५० टन जड वजनाची ओव्हरलोड वाहने आरटीओ चा कर वाचविण्याकरिता ग्रामीण मार्गाने धावतात. त्यामुळे या मार्गावर मोठे मार्गावर खड्डे पडले आहेत. या रस्त्याचे कठडे न भरल्याने या मार्गावर दररोज अनेक अपघात होत आहेत.
१७ एप्रिल रोजी दोन ओव्हरलोड वाहनाची आपसात धडक झाली. या अपघातात वाहनाचा चालक वाहनातच अडकून असल्याने त्या वाहनाला कापून चालकास गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले. या अपघातात काही हमाल जखमी झालेत. त्याचप्रमाणे २४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास दुचाकी अपघात झाले. यात दोन जणांचा मूत्यू तर एक जखमी झाले. धमदीटोला परिसरात २५ एप्रिल रोजी एक मारोती व्हॅन असंतुलीत होऊन सरळ झाडावर धडकली. या सर्व घटनेची नोंद चिचगड पोलीस ठाण्यात घेण्यात आलीे. अशा गंभीर मुद्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष दिले नाही.
या गंभीर समस्येकडे लक्ष घालून त्वरीत या समस्येचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले.या समस्येचे निराकरण झाले नाही तर या मागणीला धरून काँग्रेस पक्ष तिव्र आंदोलन करेल अशा ईशाराही देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)