लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपुल पाडण्याचा मार्ग अखेर दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मोकळा झाला आहे. रेल्वे विभागाने याला नुकतीच मंजुरी दिली असून येत्या महिनाभरात जुना जीर्ण उड्डाणपुल पाडण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपुल मुदतबाह्य झाला असून तो वाहतुकीस धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. सहा महिन्यात जीर्ण उड्डाणपुल पाडण्यास सांगितले.मात्र जिल्हा प्रशासनाने केवळ या पुलावरील जड वाहतूक बंद केली. पण उड्डाणपुल पाडण्यासंबंधीचे पाऊल उचलण्यास तब्बल दोन वर्षांचा कालावधी लावला.जीर्ण पूल पाडण्याकरिता मागील तीन वर्षांपासून ऑफिस टू ऑफिसची प्रक्रिया सुरू आहे. कधी पूल पाडण्याचा प्रस्तावाची फाईल रेल्वेकडे तर कधी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित होती. जीर्ण उड्डाणपुल पाडण्याचा प्रश्न गंभीर असताना त्यासाठी तब्बल दोन वर्षांच्या कालावधी लावला. त्यामुळे अद्यापही प्रत्यक्षात उड्डाणपुल पाडण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली नाही. विशेष म्हणजे शासनाने जीर्ण उड्डाणपुल पाडण्यासाठी ६ कोटी ५० लाख रुपयांचा व नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ८२ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. पूल पाडण्यासाठी एका एजन्सीची निवड करायची असून निविदा प्रक्रिया बोलावून हे काम करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे.जीर्ण उड्डाणपुलाचा काही भाग हा रेल्वे ट्रॅक परिसरात येत असल्याने यात रेल्वेची मंजुरी आणि मेगा ब्लाक घ्यावा लागणार आहे. जोपर्यंत रेल्वे या प्रस्तावाला ओके करीत नाही तोपर्यंत पूल पाडण्याची प्रक्रिया पुढे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून तीच प्रक्रिया सुरु आहे. आता रेल्वे पूल पाडण्याच्या प्रस्तावाला अंतीम मंजुरी दिली आहे. आ.विनोद अग्रवाल यांनी शासन स्तरावर मुद्दा लावून धरला होता.नागपूर येथील एजन्सीचा प्रस्तावजीर्ण उड्डाणपुल पाडण्यासाठी नागपूर येथील एका अनुभवी एजन्सींची निवड करण्यात आली असून त्या एजन्सीचा प्रस्ताव देखील आला असल्याची माहिती आहे. पुलाचा काही भाग हा रेल्वे ट्रॅक परिसरात असल्याने तो पाडताना सर्वच तांत्रिक गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.त्यामुळे यास विलंब होत असल्याची माहिती आहे.जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी रेल्वे विभागाची आता अंतीम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे इतर प्रक्रिया पूर्ण करुन उड्डाणपुल पाडण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.- मिथीलेश चव्हाण, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.लोकमतने केला होता पाठपुरावाशहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या जीर्ण उड्डाणपुलाचा मुद्दा सर्वप्रथम लोकमतने २४ जुलै २०१८ रोजी लावून धरला होता. त्यानंतर याचा सातत्याने पाठपुरावा केला. याचीच दखल प्रशासनाने हा जड वाहतुकीस पूर्णपणे बंद केला. त्यानंतर पूल पाडण्याचा प्रश्नाकडे सुध्दा लक्ष वेधले होते. त्याची दखल हा प्रश्न मार्गी लावला आहे.
जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:00 IST
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपुल मुदतबाह्य झाला असून तो वाहतुकीस धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. सहा महिन्यात जीर्ण उड्डाणपुल पाडण्यास सांगितले.मात्र जिल्हा प्रशासनाने केवळ या पुलावरील जड वाहतूक बंद केली. पण उड्डाणपुल पाडण्यासंबंधीचे पाऊल उचलण्यास तब्बल दोन वर्षांचा कालावधी लावला.
जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याचा मार्ग मोकळा
ठळक मुद्देरेल्वेची हिरवी झेंडी : महिनाभरात होणार प्रक्रिया सुरू,निविदा प्रक्रिया काढून एजन्सीला देणार काम